Hasan Mushrif: Hasan Mushrif: फडणवीसांची पूजा पांडुरंगालाच नापसंत; हसन मुश्रीफ यांची टोलेबाजी – hasan mushrif taunts devendra fadnavis over ashadi ekadashi mahapooja

0
28
Spread the love

कोल्हापूर: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजा यावर्षी विठ्ठलालाच नापसंत होती, म्हणून तर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मारला. ( Hasan Mushrif Taunts Devendra Fadnavis )

पंधराव्या वित्त आयोगातून पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल हसन मुश्रीफ यांचा जिल्हा परिषद सदस्यांनी सत्कार केला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मुश्रीफ यांनी राजकीय टोलेबाजी केली. ते म्हणाले, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मीच पुढच्या वर्षी आषाढी यात्रेला पांडुरंगाची सरकारी पूजा करणार म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणबाजी केली, पण त्या पांडुरंगालाच त्यांची पूजा मान्य नव्हती, यामुळे त्यांच्या पक्षाचे सरकार गेले आणि मुख्यमंत्रिपदही, अशा शब्दांत मुश्रीफ यांनी फडणवीस यांना चिमटा काढला.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार यावे, उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत असे, त्या पांडुरंगालाच वाटत असावे, म्हणून तर आम्ही सत्तेवर आलो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पूजा व्हावी असे पांडुरंगाला वाटत असल्याने ती इच्छा ठाकरेंच्या पूजेने पूर्ण झाली, असा टोलाही मुश्रीफ यांनी मारला. फडणवीस यांच्यावर निशाना साधताना ते म्हणाले, ‘महाविकास आघाडी सत्तेवर येताच दोन महिन्यांतच करोना साथीचे संकट आले. मुंबईत त्याचा कहर झाला. पण कोणताही फारसा अनुभव नसलेल्या सरकारने चार महिन्यात जे मुंबईत काम केले, ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, त्यामुळे या भागातील करोना आटोक्यात आला. फडणवीस यांनी वेळात वेळ काढून सरकारचे हे मुंबईतील काम पहावे, एवढे चांगले काम पाहून त्यांचेही डोळे पांढरे होतील’.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)