IAF Su-30MKI and MiG-29 fighter aircraft carrying out air operations at a forward airbase near India-China border scj 81 | जोश इज हाय! घातक अपाचे, मिग २९ प्रहार करण्यासाठी सज्ज

0
54
Spread the love

भारत चीन सीमेवरच्या वायुदलाच्या तळावर अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर, Su-30 MKI आणि मिग २९ या लढाऊ विमानांनी कसून सराव केला. आम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत असं भारतीय वायुदलाच्या विंग कमांडरने म्हटलं आहे. आमचा जोश कायमच हाय असणार आहे असंही त्याने म्हटलं आहे. गलवान खोऱ्यात भारत आणि चीन या दोन देशांमध्ये जो संघर्ष झाला त्यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर चीनविरोधात देशात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. अशात कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाख आणि लेहमध्ये जाऊन जवानांची भेट घेतली आणि त्यांचं मनोधैर्य उंचावण्याचं काम केलं.

या सगळ्या परिस्थितीत भारत चीन सीमेवर भारतीय वायुदलाने मिग २९, अपाचे हेलिकॉप्टर आणि Su-30 MKI  या घातक लढाऊ विमानांचा कसून सराव केला.  भारत आणि चीनमध्ये जो तणाव निर्माण झाला आहे तो पाहता आमच्याशी आगळीक केली तर तसेच प्रत्युत्तर मिळेल असाच इशारा एक प्रकारे भारताने दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 8:24 pm

Web Title: iaf su 30mki and mig 29 fighter aircraft carrying out air operations at a forward airbase near india china border scj 81


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)