ICICI बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, करोना संकटात काम केल्याचं मिळालं मोठं ‘गिफ्ट’ | ICICI Bank to reward 80k employees with up to 8% pay hike for work done during COVID-19 sas 89

0
21
Spread the love

करोना संकटकाळात एकीकडे बहुतांश कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करत आहेत. पण, देशातील दुसरी सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या आयसीआयसीआय (ICICI) बँकेने मात्र आपल्या कर्मचाऱ्यांना गुड न्यूज दिली आहे.

बँकेने आपल्या ८० हजार ‘फ्रंटलाइन’ कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, करोना संकटकाळात काम केल्याचं या ८० हजार कर्मचाऱ्यांना गिफ्ट देण्यात आलं आहे. त्यांच्या पगारात ८ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

कोणाचा पगार वाढणार आणि कधीपासून ?-
पगारात वाढ झालेले सर्व कर्मचारी एम1 आणि त्याखालील श्रेणीतील आहेत. यातील बहुतांश फ्रंटलाइन कर्मचारी आहेत, ज्यांचा थेट ग्राहकांशी संबंध येतो. याबाबत बॅंकेशी इमेलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला पण त्यावर उत्तर मिळालेलं नाही. पण, सुत्रांच्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2020-21 साठी ही पगारवाढ करण्यात आली असून जुलै महिन्यापासून ही वाढ लागू होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 9:28 am

Web Title: icici bank to reward 80k employees with up to 8 pay hike for work done during covid 19 sas 89


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)