Increase in patient Thane district despite lockdown abn 97 | टाळेबंदीतही ठाणे जिल्ह्यात रुग्णवाढ

0
24
Spread the love

जयेश सामंत/ नीलेश पानमंद

जिल्ह्य़ामध्ये करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आठ दिवसांपासून टाळेबंदी लागू करण्यात आली असली तरी या काळात जिल्ह्य़ात १४ हजार २०७ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत सर्वाधिक रुग्णवाढ होत असून, त्यापाठोपाठ ठाणे महापालिका क्षेत्राचा क्रमांक आहे. टाळेबंदीच्या काळात नवी मुंबईतील रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली असून भिवंडी, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथेही रुग्णवाढीचे प्रमाण काहीसे कमी झाले असले तरी रुग्णसंख्या पूर्णत आटोक्यात मात्र आलेली नाही.

केंद्र आणि राज्य शासनाने जून महिन्यात टाळेबंदी शिथिल केल्यानंतर या शहरांमधील बाजारपेठा आणि दुकाने सुरू करण्यात आली होती. मात्र, टाळेबंदी शिथिलीकरणानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याचा दावा करत पालिका आणि जिल्हा प्रशासनाने पुन्हा टाळेबंदी लागू केली. टाळेबंदीमुळे करोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचे अंदाज वर्तविले जात होते. प्रत्यक्षात ही संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.

ठाणे जिल्ह्य़ात आतापर्यंत एकूण ४८ हजार ८५६ रुग्ण आढळले असून त्यापैकी १४ हजार २०७ रुग्ण टाळेबंदीच्या काळात आढळून आले आहेत. रुग्णवाढीचे हे प्रमाण २९ टक्के इतके आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात टाळेबंदीच्या आधी म्हणजेच १ जुलै रोजी ३५० रुग्ण आढळले होते. त्यानंतर या ठिकाणी टाळेबंदीच्या काळात रुग्णसंख्या वाढल्याचे चित्र असून शहरात दररोज सुमारे ५०० ते ६०० रुग्ण आढळून येत आहेत, तर ठाणे शहरात १ जुलैला ३६६ रुग्ण आढळून आले होते. या ठिकाणी टाळेबंदीच्या काळात दररोज सुमारे ३५० ते ४२० रुग्ण आढळून येत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 12:28 am

Web Title: increase in patient thane district despite lockdown abn 97


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)