Increase in private hospitals in Vasai for treatment of coronavirus zws 70 | करोनावरील उपचारांसाठी वसईतील खाजगी रुग्णालयांत वाढ

0
26
Spread the love

शहरातील १२ खाजगी रुग्णालयांत शासकीय दराने होणार उपचार

वसई : करोनाबाधित रुग्णांवार उपचार व्हावेत यासाठी महापालिकेने खाजगी रुग्णालये अधिग्रहित करून त्यात करोनाग्रस्तांसाठी खाटा आरक्षित करणे सुरू केले आहे. पालिकेने आणखी दोन खाजगी रुग्णालये अधिग्रहित केल्याने करोनावर उपचार करणाऱ्या खाजगी रुग्णालयांची एकूण संख्या आता १२ एवढी झाली आहे.

वसई-विरार शहरात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ  लागली आहे. त्यात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक असले तरी श्वसनाचे आजार असलेले गंभीर आजारी रुग्णदेखील आहेत. त्यामुळे बऱ्याचशा रुग्णालयांमध्ये रुग्णांना खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. सध्या पावसाचे दिवस सुरू झाल्याने करोनाचा संसर्ग अजून वेगाने वाढण्याची शक्यता आहे. अशात आद्र्रता जास्त असलेल्या वातावरणात श्वसनासंदर्भातील आजारांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. अशा रुग्णांना रुग्णालयात ऑक्सिजन तसेच कृत्रिम श्वसननलिकेद्वारे उपचार देण्याची गरज असते. त्यामुळे पालिकेने खाजगी रुग्णालये अधिग्रहित करून त्यात खाटा उपलब्ध करून देण्याचे प्रमाण वाढवले आहे. पूर्वी पालिकेने १० खाजगी रुग्णालये अधिग्रहित केली होती. आता त्यात २ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील करोनावर उपचार करणाऱ्या खाजगी रुग्णालयांची संख्या एकूण १२ एवढी झाली आहे.

नालासोपाऱ्यातील रिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात करोना रुग्णांसाठी महापालिकेतर्फे मोफत उपचार केले जातात. त्यासाठी पालिकेने ५० खाटा आरक्षित केलेल्या होत्या. आता पालिकेने या रुग्णालयातील आणखी ५० खाटा आरक्षित केल्या असून त्यात शासकीय दराने उपचार केले जाणार आहेत. राज्य शासनाने यापूर्वी खाजगी रुग्णालयांना करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी दर निश्चित करून दिले आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालये रुग्णांची आर्थिक लूट करू शकणार नाहीत, असे पालिकेने सांगितले.

करोना रुग्णांवर उपचार करणारी खाजगी रुग्णालये

* स्टार रुग्णालय , पाटणकर पार्क, नालासोपारा (प.)

* विनायका रुग्णालय, आचोळे गाव, नालासोपारा (पू.)

* गोल्डन पार्क रुग्णालय साईनगर, वसई(प.)

* विजय वल्लभ रुग्णालय बोळींज, विरार(प.)

* रिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी रुग्णालय,  नालासोपारा (प.)

* कार्डिनल ग्रेसियस मेमोरियल रुग्णालय,बंगली,

* गॅलेक्सी रुग्णालय,पेल्हार, वसई (प.)

* आयएएसआयएस रुग्णालय, एव्हरशाइन सिटी, वसई (पू.)

* जनसेवा हेल्थकेअर एल. पी.पी. पापडी, वसई(प.)

* प्लॅटिनम रुग्णालय प्रा.लि. गोखिवरे, वसई (पू.)

* प्रियदर्शनी नर्सिग होम मनवेलपाडा, तलावाजवळ, विरार (पू.)

* आयएम बिल्डकॉन मल्टीस्पेशालिटी, हाथी मोहल्ला रोड, वसई (प.),

शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र, गंभीर रुग्णांना दिलासा मिळेल या दृष्टीने पालिकेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. करोना रुग्णांवर राज्य शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार उपचार होतील, या दृष्टीनेही पालिका प्रयत्नशील आहे.

– गंगाथरन डी., आयुक्त

या संदर्भात तक्रारी आढळल्यास याबाबत करोना कंट्रोल युनिट दूरध्वनी क्रमांक ०२५०-२३३४५४६/ ०२५०-२३३४५४७ वर तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 1:01 am

Web Title: increase in private hospitals in vasai for treatment of coronavirus zws 70Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)