India China Border Dispute: चीन भारतीय सीमेतून मागे हटला, PM मोदींनी देशाची माफी मागावीः काँग्रेस – india china border dispute pm modi should apologize on earlier statement on china demand congress

0
21
Spread the love

नवी दिल्लीः पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात भारत-चीनमधील तणाव काही प्रमाणात कमी होताना दिसतोय. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री आणि सुरक्षा सल्लागार असलेल्या वांग यी यांच्याशी चर्चा केली. रविवारी रात्री किमान तास दोघांमध्ये चर्चा सुरू होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. यानंतर गलवान खोऱ्या चिनी सैनिक मागे हटलेत. या प्रकरणी आता काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.

पंतप्रधान मोदींनी आता देशाची माफी मागावी. मोदींनी आपल्या आधीच्या वक्तव्याही ही माफी मागायला हवी. भारताच्या सीमेत कुणी घुसलं नाही आणि कुणी पोस्टवर कब्जाही केला नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. आता यावर मोदींनी माफी मागावी, असं काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा म्हणाले.

काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

सीमेवर भारतासोबत वाढत असलेल्या तणावामुळे आपले सैन्य मागे घेत असल्याचं चीनने अधिकृतपणे म्हटलं आहे. पेट्रोलिंग पॉइंट १४ येथे दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने आले होते. आता तिथून दोन्ही देशांचे सैनिक काही किलोमीटर मागे हटले आहेत. आता या प्रकरणी काँग्रेसने सरकारकडे मागणी केली आहे. पंतप्रधान मोदींनी या आधी सर्वपक्षीय बैठकीत केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी आणि तसंच पंतप्रधान मोदी किंवा संरक्षणमंत्र्यांनी लडाखमध्ये सध्या काय स्थिती आहे, याती माहिती देशाला द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केलीय.

पंतप्रधान मोदींनी या संधीचा फायदा उचलून देशाला संबोधित केले पाहिजे. देशाला विश्वासात घेतले पाहिजे. आणि हा आपल्याकडून चूक झाली आहे. देशाची दिशाभूल केली आहे. ते आणखी दुसऱ्या शब्दांचाही उपयोग करू शकतात. आपण चुकीचं आकलन केलं असं ही ते म्हणू शकतात, असा टोला काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी लगावला.

सर्वपक्षीय बैठकीतील वक्तव्यावरून मोदींना घेरले

पूर्व लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर तणाव वाढला असताना १५ जूनच्या रात्री गलवानमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. यात भारताचे २० जवान शहीद झाले. या घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. भारतीय सीमेत ना कुणी घुसलंय आणि ना कुणी पोस्टवर कब्जा केला आहे, असं मोदी त्या बैठकीत म्हणाले होते. त्या वक्तव्यावरून काँग्रेसने पंतप्रधान मोदींना घेरण्याचा आता प्रयत्न केला आहे.

गलवानमध्ये चीनला मागे हटवण्यात भारताची ‘ही’ रणनिती आली कामी!

चीन झुकण्यामागे NSA अजित डोवल कनेक्शन! रात्री दोन तास चालली चर्चा

लष्कराला प्रमाणपत्राची गरज नाहीः खेडा

भारतीय सैन्य चीनच्या पीएलएला मागे हटवण्याचा प्रयत्न करत आहे. यात यश आल्याने समाधान झालं. देशाच्या सैन्यावर आम्हाला अभिमान आहे. देशाच्या सैन्याच्या क्षमतेवर आमच्या मनात कुठलीही शंका नाहीए. भारतीय सैन्याने यापूर्वीही शौर्य दाखवले आहे. मग ते पाकिस्तान असो की चीन. आपल्या सैन्याला प्रमाणपत्राची गरज नाही, असं खेडा म्हणाले.

PM मोदींनी स्पष्ट करावं

चिनी सैन्य किती किलोमीटर मागे हटले आणि भारताच्या एकूण किती भागावर चीनचा अजूनही कब्जा आहे. जे काही ६ ते ७ पॉइंट आहेत त्याबद्दल मोदींनी जनतेला माहिती दिली पाहिजे, असं म्हणत काँग्रेसने यांनी मोदींकडून स्पष्टीकरणाची मागणी केलीय.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)