India reports the highest single day spike of 24879 new COVID19 cases and 487 deaths in the last 24 hours | चिंतेचे ढग गडद; करोनाच्या शिरकावानंतर देशातील रुग्णसंख्येत सर्वात मोठी वाढ

0
26
Spread the love

देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज २० हजारांपेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांमध्ये देशात सर्वाधिक म्हणजेच २४ हजार ८७९ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तसंच ४८७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.

दरम्यान, भारतातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ७ लाख ६७ हजारांच्या वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ९ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत भारतातील करोनाबाधितांची एकूण संख्या ७ लाख ६७ हजार २९६ इतकी झाली आहे. यापैकी २ लाख ६९ हजार ७८९ अॅक्टिव्ह केसेस आहे. तर आतापर्यंत ४ लाख ७६ हजार ३७८ रूग्ण पूर्णपणे बरे अथवा त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे. तर दुसरीकडे देशात आतापर्यंत २१ हजार १२९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहितीही समोर आली आहे.

दरम्यान, जगभरातील करोनाग्रस्तांची एकूण संख्याही १ कोटी २० लाखांच्या वर पोहोचली आहे. नव्या आकडेवारीनुसार आतापर्यंत जगभरात १ कोटी २१ लाख ६६ हजार ६८८ रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत ५ लाख ५२ हजार ४६ जणांना करोनामुळे मृत्यू झाला. तर दुसरीकडे आतापर्यंत जगभरातील ७० लाख ३० हजार २२७ जणांनी करोनावर मात केली आहे. तसंच करोनाबाधितांची सर्वाधिक नोंद ही अमेरिकेत करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 10:34 am

Web Title: india reports the highest single day spike of 24879 new covid19 cases and 487 deaths in the last 24 hours jud 87Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)