India slams Pakistan at UNOCT Virtual Counter Terrorism Week jammu kashmir important part of india | “जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता आणि राहिल”; UNOCT मध्ये पाकिस्तानला चपराक

0
33
Spread the love

अनेकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर निरनिराळ्या कारणांवरून पाकिस्ताननं भारताला घेरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु असं असतानाही पाकिस्तानच तोंडावर पडल्याचं पाहायला मिळालं होतं. तसंच दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या आरोपावरूनही अनेकदा पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतानं घेरलं होतं. दरम्यान, जम्मू काश्मीरबाबत पाकिस्ताननं कुरापती करणं सोडून द्यावं. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता आणि कायम राहिल, असं म्हणत भारतानं पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला चपराक लगावली आहे.

जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहिल, असं प्रतिक्रिया काऊंटर टेररिजमचे परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव महावीर सिंघवी व्यक्त केली. ‘UNOCT व्हर्च्युअल काऊंटर टेररिझम विक’ला संबोधित करताना ते बोलत होते. “जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सुरू असलेल्या कुरापती आता थांबवल्या पाहिजेत. पाकिस्तानकडून दुसरंच काही दाखवण्याचा प्रयत्न होतो. परंतु ते जे करत आहेत तो म्हणजे प्रायोजित सीमापार दहशतवाद आहे,” असं सिंघवी म्हणाले.

“पाकिस्तानकडून सुरू असलेल्या प्रॉक्सी वॉर आणि प्रायोजित सीमापार दहशतवादानंतरही काश्मीरमधील जनतेने भारतीय लोकशाहीवर आपला विश्वास कायम ठेवला आहे आणि भारताने याचा नेहमीच पुनरुच्चार केला आहे,” असं सिंघवी यांनी स्पष्ट केलं. “भारतानं कायमच जगभरात मानवाधिकाराचं जतन करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम केलं आहे. तसंच दहशतवादाविरोधात कायम कठोर भूमिका घेतली आहे. दहशतवादाविरोधात भारतानं कायम पावलं उचलली आहेत. परंतु पाकिस्ताननं कायमच दहशतवादाला मुख्य प्रवाहात ठेवलं आहे,” असंही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 7:40 am

Web Title: india slams pakistan at unoct virtual counter terrorism week jammu kashmir important part of india jud 87Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)