Indian goods: उत्सवाच्या काळात ७ कोटी छोटे व्यापारी चीनला धडा शिकवणार; कसा तो वाचा! – in this festive season cait preparing availability of indian goods in market

0
31
Spread the love

नवी दिल्ली: करोना व्हायरस आणि चीन सोबत सीमेवर सुरू असलेला तणाव या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्टपासून देशात उत्सवांना सुरूवात होत आहे. उत्सवाच्या सीझन नोव्हेंबरपर्यंत चालेल. या काळात राखी, जन्माष्ठमी, गणेशोत्सव, नवरात्री, दुर्गा पूजा, दिवाळी, लक्ष्मीपुजन, भाऊभीज, तुळसी विवाह आदी सण येतात. या काळात बाजरपेठेत भारतीय वस्तू उपलब्ध होतील यासाठी किरकोळ व्यापाऱ्यांनी एक योजना तयार केली आहे. या योजनेमुळे चीनला मोठा फटका बसेल.

वाचा- ‘या’ बँकेने दिली ८० हजार जणांना पगार वाढ; करोना संकटात काम केल्याचे बक्षिस!

चीनला धडा शिकवण्यासाठी देशात सध्या चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन दिले जाते आहे. या पार्श्वभूमीवर कॅट या किरकोळ व्यापाऱ्यांच्या संघटनेने एक योजना तयार केली असून त्यांनी संपूर्ण देशातील सदस्यांना एक पत्र दिले आहे. कॅटने एक यादीच तयार करत आहे. ही यादी ११ जुलैपर्यंत तयार होईल.

वाचा- नीरव मोदीला दणका ; मुंबई,दुबई आणि लंडनमधील फ्लॅट जप्त

सदस्यांना लिहलेल्या पत्रात कॅटने सर्व राज्यातील आणि अन्य मुख्य व्यापारी संघटना यांना सल्ला दिला आहे की त्यांनी फक्त भारतीय वस्तू निर्मिती करणाऱ्यांकडून वस्तू विकत घ्याव्यात. यात महिला उद्योग, स्टार्टअप आदींचा समावेश आहे. कॅटकडून भारतीय वस्तूंची निर्मीती करणाऱ्या देशातील सर्व उद्योगांची यादी तयार केली जात आहे. ही यादी तयार करताना संबंधीत उद्योगांकडून त्याच्या राज्यात किती उत्पादन घेतले जाते. तसेच त्याचे किती विक्री केली जाते याची माहिती घेतली जाईल. ही सर्व माहिती १५ जुलैपर्यंत गोळा केली जाईल.

वाचा- करोना काळात कमवले ९७ हजार ४०० कोटी!

संबंधीत माहिती त्यानंतर कॅटच्या दिल्लीतील मुख्यालयात पाठवली जाईल. या माहितीच्या आधारे देशात किती वस्तूचे उत्पादन होते आणि आणखी किती उत्पादनाची गरज आहे हे निश्चित केले जाईल. त्यानुसार देशात भारतीय वस्तूंची कमतरता होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.

वाचा- कर्ज झाली स्वस्त ; सर्वात मोठ्या बँकेने केली व्याजदर कपात

यावेळी होणाऱ्या उत्सवांच्या काळात फक्त भारतीय वस्तूची आम्ही विक्री करणार आहोत. ही योजना यशस्वी करण्यासाठी महिलांच्या गटाची स्थापना करण्यात आली आहे असे कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतीय आणि सचिव प्रविण खंडेलवाल यांनी सांगितले.

कॅट देशातील जवळजवळ ७ कोटी छोटे व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करते.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)