Instead of online education home based education from teachers to students in Chandrapur aau 85 |ऑनलाइन शिक्षणाऐवजी, शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना घरपोच शिक्षण

0
26
Spread the love

रवींद्र जुनारकर

करोना विषाणूचा संसर्ग अद्यापही कमी झालेला नसल्याने पूर्ण क्षमतेने शाळा सुरु करण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महापालिकेने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ‘शाळा बंद, शिक्षण सुरु’ हा अनोखा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षक मंडळी विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन शिकवत आहेत.

करोना टाळेबंदी ३१ जुलैपर्यंत चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात जवळपास ३०० शाळांमध्ये शिक्षण सुरू झाले. मात्र, पालक आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर बहुतांश शाळांनी वर्ग बंद करून ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. तर इंग्रजी माध्यमांच्या शाळा व कॉन्व्हेंटमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. मात्र, जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या शाळेत आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात त्यामुळे त्यांच्याकडे स्मार्टफोन असेलच असे नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना शिक्षण देणे कठीण आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होता यावर उपाय म्हणून चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, प्रशासकीय अधिकारी (शिक्षण) नागेश नीत यांनी अतिशय कल्पकपणे ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ हा उपक्रम सुरू केला आहे.

नीत यांच्या माहितीनुसार, “करोना काळात शाळा बंद आहे. पालक व विद्यार्थ्यांचाही शाळा बंद ठेवण्याचा आग्रह आहे. मात्र, अशाही स्थितीत शिक्षण सुरू ठेवायचे आहे. महापालिकेच्या शाळेत सर्व गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. केवळ १० टक्के विद्यार्थ्यांकडेच मोबाईल आहे. त्यामुळे शिक्षकांनीच विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.”

असा आहे ‘शाळा बंद, शिक्षण सुरु’ उपक्रम

शहरात महापालिकेच्या पहिली ते दहावी पर्यंतच्या २९ शाळा असून २,४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर ७४ शिक्षक या शाळांमध्ये कार्यरत आहेत. या सर्व ७४ शिक्षकांनी दररोज दहा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षणाचे धडे द्यायचे आहेत. एखाद्या प्रभागात जर आठ ते दहा विद्यार्थी जवळ राहात असतील तर त्यांना एकत्र एकाच घरी आणून तिथेच त्यांचा वर्ग घ्यायचा आहे. आठवडाभरापासून हा उपक्रम महापालिकेचे शिक्षण राबवित आहेत. दहा विद्यार्थ्यांचा ४५ मिनिटं वर्ग घ्यायचा, त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसरे दहा विद्यार्थी. हा वर्ग घेतांना विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करण्यासाठी गृहपाठ तथा इतर अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सूचना द्यायची. विशेष म्हणजे या उपक्रमाला विद्यार्थी व पालक यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थी व शिक्षक मास्क लावून, सॅनिटायझरने हात स्वच्छ करून शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत पुस्तके मोफत देण्यात आलेली आहेत, असेही नीत यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 1:32 pm

Web Title: instead of online education home based education from teachers to students in chandrapur aau 85


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)