jalgaon news News : Coronavirus In Jalgaon राज्यात ‘या’ जिल्ह्यातील करोना मृत्यूदर धडकी भरवणारा – covid 19 updates jalgaon reports 11 more fatalities, 156 new cases

0
22
Spread the love

जळगाव:जळगाव जिल्ह्यात करोना संसर्ग वेगाने पसरत चालला आहे. आज सोमवारी पुन्हा १५६ नवे करोना बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ४५८६ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील करोना बळींची संख्या देखील चिंता वाढवित आहे. आज एकाच दिवशी ११ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २८२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ( Coronavirus In Jalgaon )

वाचा: महाराष्ट्र पोलीस करोनाच्या विळख्यात; ‘हे’ आकडे चिंता वाढवणारे

जळगाव जिल्हा प्रशासनाला सोमवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये एकूण १५६ नवे करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात जळगाव शहर ५६, जळगाव ग्रामीण १८, अमळनेर ७, भुसावळ १२, भडगाव ३, बोदवड १, चोपडा ८, धरणगाव ७, एरंडोल १, जामनेर १३, मुक्ताईनगर १०, पाचोरा ४, रावेर १२ आणि यावल येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. आज चाळीसगाव व पारोळा येथे एकही रुग्ण आढळला नाही ही एक दिलासादायक बाब आहे.

जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत १५८७ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २७१७ रुग्णांनी करोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज सोमवारी १०६ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला.

वाचा: उद्धव ठाकरे ‘मातोश्री’च्या पिंजऱ्यात; महाराष्ट्रात मुख्यमंत्रीच नाही: राणे

आज तब्बल ११ जणांचा मत्यू

जिल्ह्यातील करोना बळींची संख्या वाढतच आहे. गेल्या काही दिवसांत दिवसाला ७ ते ११ जणांचा दररोज मृत्यू होत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. आज सोमवारी देखील ११ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चाळीसगाव तालुक्यात ६४ वर्षीय व ८० वर्षीय अशा दोन पुरुषांचा मृत्यू झाला आहे. पारोळा तालुक्यात ५५ वर्षीय महीला, भुसावळ तालुक्यातील ८३ वर्षीय पुरुष, एरंडोल तालुक्यातील ७३ वर्षीय पुरुष व ८० वर्षीय महीला, भडगाव तालुक्यातील ४५ वर्षीय महीला, यावल तालुक्यातील ७३ वर्षीय व ६२ वर्षीय पुरुष, रावेर तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष व जळगाव शहरातील ६२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

वाचा: राज्यात ८ जुलैपासून हॉटेल्स व लॉज सुरू होणार; पण या असतील अटी

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)