Jaya Bachchan and Aishwarya Rai Bachchan have tested negative for COVID 19 scj 81| ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांचाही करोना चाचणी अहवाल आला समोर..

0
22
Spread the love

ऐश्वर्या राय आणि जया बच्चन या दोघींचीही करोना चाचणी झाली. या दोघींचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. शनिवारी रात्री उशिरा महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन या दोघांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे या दोघांनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या दोघांनीही त्यांची कोविड १९ चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं आहे. दरम्यान ऐश्वर्या राय बच्चन आणि जया बच्चन यांचा करोना चाचणी अहवालही समोर आला आहे. हा अहवाल निगेटिव्ह असल्याचं एका इंग्रजी वेबसाइटने म्हटलं आहे.

शनिवारी रात्री उशिरा अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांनाही मुंबईतील नानावाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दोघांनीही करोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहेत. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या जलसा आणि जनक बंगल्यातील कर्मचाऱ्यांचीही करोना चाचणी केली जाणार आहे. तसंच गेल्या दहा दिवसात जे माझ्या संपर्कात आले होते त्यांनी करोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहनही अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटमध्ये केलं आहे. दरम्यान ऐश्वर्या राय बच्चन आणि जया बच्चन या दोघींचीही करोना चाचणी झाली आणि ती निगेटिव्ह आली आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 1:22 am

Web Title: jaya bachchan and aishwarya rai bachchan have tested negative for covid 19 scj 81


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)