JioMeet, Zoom ला देणार टक्कर, आता एअरटेल आणणार व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप | Bharti airtel may soon launch video conferencing app to compete zoom and JioMeet sas 89

0
26
Spread the love

Reliance Jio ने काही दिवसांपूर्वीच नवीन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप JioMeet लाँच केलं. त्यानंतर आता दुसरी आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप लाँच करण्याच्या तयारीत आहे.

इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, भारती एअरटेल लवकरच झूम, गुगल हँगआउट्स, माइक्रोसॉफ्ट टीम्स आणि JioMeet ला टक्कर देण्यासाठी एक नवीन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग टूल लाँच करण्याची शक्यता आहे. सुरूवातीला एअरटेलकडून हे अ‍ॅप छोट्या कंपन्यांसाठी ‘पेड’ स्वरुपात आणलं जाईल. म्हणजेच ते मोफत नसेल. अ‍ॅपला मिळणारा प्रतिसाद बघून कंपनी हे अ‍ॅप सर्व सामान्य ग्राहकांसाठी रोलआउट करेल.

एअरटेलच्या अ‍ॅपमध्ये लेटेस्ट AES 256 इन्क्रिप्शन आणि सिक्युरिटीसाठी अनेक ऑथेंटिकेशन असू शकतात. या अ‍ॅपसाठी उच्चदर्जाच्या सिक्युरिटीवर कंपनी विशेष लक्ष देईल. JioMeet प्रमाणे एअरटेलचं अ‍ॅपही सर्व डिव्हाइस आणि प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल. यात मोबाइल आणि डेस्कटॉपचाही समावेश आहे. पण अद्याप एअरटेलकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 12:58 pm

Web Title: bharti airtel may soon launch video conferencing app to compete zoom and jiomeet sas 89Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)