Kamaal R Khan Amitabh Bachchan Hansal Mehta Sushant Singh Rajput mppg 94 | “कमाल आर. खानला अनफॉलो करा”; दिग्दर्शकाची अमिताभ बच्चन यांना विनंती

0
24
Spread the love

अभिनेता कमाल आर. खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. मात्र त्याच्या या सातत्याने केल्या जाणाऱ्या टीकेवर दिग्दर्शक हंसल मेहता संतापले आहेत. परिणामी त्यांनी अमिताभ बच्चन यांना कमाल खानला अनफॉलो करण्याची विनंती केली आहे.

कमाल खान सध्या सुशांत सिंह राजपुतच्या निमित्ताने बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींवर घराणेशाहीचे आरोप करत आहे. मात्र कधीकाळी त्याने देखील सुशांतवर यथेच्च टीका केली होती. त्याला फ्लॉप अभिनेता म्हणून चिडवलं होतं. कमालच्या या आक्षेपार्ह ट्विट्सचे स्क्रीनशॉट पोस्ट करुन हंसल मेहता यांनी त्याची पोलखोल केली आहे. तसेच बिग बींना त्याला अनफॉलो करण्याची विनंती केली आहे.

हंसल मेहता यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. कमाल खान उर्फ केआरके आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी प्रसिद्ध आहे. या पार्श्वभूमीवर तो हंसल मेहतांच्या आरोपांवर काय प्रतिक्रिया देतो याकडे आता नेटकऱ्यांचं लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 11:18 am

Web Title: kamaal r khan amitabh bachchan hansal mehta sushant singh rajput mppg 94Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)