kanpur encounter: भयंकर! गँगस्टरची बायको मोबाइलवर पोलीस एन्काउंटर LIVE बघत होती – kanpur encounter gangster vikas dubey wife watching encounter live on mobile phone

0
30
Spread the love

कानपूरः उत्तप्रे देशात सध्या गाजत असलेल्या कानपूर एन्काउंटरसंदर्भात धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणात गँगस्टर विकास दुबे याची बायको ऋचा दुबेचीही माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर विकास आणि त्याची बायको दोघेही फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस आणि गँगस्टर विकास दुबे याच्या टोळीत ज्यावेळी गोळीबार सुरू झाला त्यावेळी सीसीटीव्हीद्वारे त्याची पत्नी ऋचा दुबे ही घटना मोबाइल लाइव्ह बघत होती. त्यानंतर ती मुलासह बिकारू गावातून पळून गेली.

कानपूरच्या बिकारू गावात शुक्रवारी रात्री ही एन्काउंटरची घटना घडली. याच गँगस्टर विकास दुबेने ८ पोलिसांची गोळ्या घालून निर्घृण हत्या केली होती. या भयावह घटनेनंतर विकास दुबेची बायको ऋचा दुबे ही बिकारू गावातून मुलाला घेऊन पळाली. या घटनेनंतर पोलिसांनी घराची झडती घेतली. यात विकास दुबेच्या बायकोचा मोबाइल पोलिसांच्या हाती लागला. हा फोन घरात लावलेल्या सीसीटीव्हीला कनेक्ट केलेला होता, असं पोलिसांना आढळून आलंय.

२०१७ मध्ये गँगस्टर पतीला वाचवण्याचा प्रयत्न

ऋचा दुबेची घर आणि आसपासच्या परिसरातील हाचलींवर सीसीटीव्हीद्वारे नजर होती. यामुळे तिने फुटेज डिलिट करण्यासाठी मोबाइलचा उपयोग केला. यापूर्वी २०१७ मध्ये विशेष पथकाने विकास दुबेला अटक केली होती. त्यावेळी तिने पतीला वाचवण्यासाठी त्याच्या अटकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. पोलीस पतीचे एन्काउंटर करतील, अशी तिला भीती होती.

पुलवामा: चकमकीत १ दहशतवादी ठार, २ जवान जखमी

पोलिसांनी ऋचा दुबेच्या नातेवाईकांशी संपर्क केला. पण ती कुठेच नाहीए. ऋचा ही बहुतेक वेळ कानपूरमध्येच राहात होती. पण आपल्या मोबाइलवरून ती घरातील हालचालींवर नजर ठेवून होती. यामुळे नोकरांसह इतर काम करणारे सर्व साधव होते. कारण ऋचा दुबे सतत त्यांची झडती घेत होती. तिने आपल्या गँगस्टर पतीला आणि त्याच्या काळ्या धंद्यांना कायम समर्थन दिलं. गावात कधीच महिलांसोबत बातचीत केली नाही, असं एका स्थानिकाने सांगितलं.

‘त्या’ व्हायरल पत्रातून विकास दुबे-पोलिसांचे कनेक्शन होतंय उघड

फरार विकास दुबेला पकडण्यासाठी ४० पथकं

पोलिसांची हत्या करून फरार झालेला गँगस्टर विकास दुबे याला पकडण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांची ४० पथकं आणि स्पेशल टास्क फोर्स रवान करण्यात आले आहेत. विकास दुबेचे सहकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची माहिती घेतली जात आहे. त्यांच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात हत्यारं कुठून आली? कुठल्या प्रकारच्या हत्यारांचा वापर केला गेला? माहिती मिळाली होती की कुणी हत्यारं लपवून ठेवली होती? याचा तपास पोलीस करत आहेत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)