Karan Johar Parties With Ranbir Kapoor At Neetu Kapoor’s B’Day Gets trolled avb 95

0
18
Spread the love

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर घराणेशाही हा वाद पेटून उठला. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांचे अनुभव सांगितले आहेत तर काहींनी बॉलिवूड सोडण्याचे कारण सांगितले. पण नेटकऱ्यांनी मात्र चित्रपट निर्माता करण जोहरला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले. या ट्रोलिंगमुळे करण पूर्णपणे खचला असून तो रडत असल्याचा खुलासा त्याच्या एका जवळच्या मित्राने केला होता. पण आता  करणला एका पार्टीमध्ये पाहिल्यावर नेटकऱ्यांनी त्याला पुन्हा ट्रोल केले आहे.

नुकताच नीतू कपूर यांनी त्यांचा ६२ वा वाढदिवस सेलिब्रेट केला. वाढदिवसानिमित्त त्यांनी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला कुटुंबातील काही सदस्य आणि जवळच्या मित्र परिवाराला बोलवण्यात आले होते. वाढदिवस साजरा करतानाचे काही फोटो नीतू यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. या फोटोंमध्ये करण देखील दिसून आला. त्याला पार्टीमध्ये पाहून नेटकऱ्यांनी पुन्हा त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

एका नेटकऱ्याने ‘आम्ही ऐकले होते करण जोहर खचला असून रडत आहे. इथे त्याच्या कडे पाहून असे वाट नाही’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने करण जोहरला ‘ड्रामा किंग’ असे म्हटले आहे.

‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत करणच्या मित्राने त्याच्यावर ट्रोलिंगचा परिणाम झाला असल्याचे सांगितले होते. “सुशांतच्या आत्महत्येनंतर होत असलेल्या ट्रोलिंगमुळे करण पूर्णपणे हादरला आहे. त्याच्या तीन वर्षांच्या जुळ्या मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या सर्वांचा त्याच्यावर खूप परिणाम होत आहे. करणला जेव्हा कधी मी फोन करतो, तेव्हा तो रडतो. यात माझी काय चूक आहे, असा प्रश्न तो विचारतो”, असे करणच्या मित्राने सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 7:17 pm

Web Title: karan johar parties with ranbir kapoor at neetu kapoors bday gets trolled avb 95Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)