katrina kaif clicks photo of sister isabella gone viral avb 95

0
37
Spread the love

अत्यंत कमी वेळात आपल्या अभिनयाने अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. तिने बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये स्वत:च्या स्थान मिळवले आहे. कतरिनाने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. फॅशनसेन्स, उत्तम अभिनयशैली आणि चेहऱ्यावरील गोड हास्यामुळे तिने अनेकांच्या मनात घर केले आहे. तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. नुकताच कतरिनाने शेअर केलेला फोटो चर्चेत आहे. या फोटोमध्ये तिची बहिण दिसत आहे.

कतरिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बहिणीचा फोटो शेअर केला. कतरिनाच्या बहिणीचे नाव इसाबेल आहे. कतरिनाने इसाबेलचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. इसाबेल या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.

हा फोटो शेअर करत कतरिनाने छान असे कॅप्शन दिले आहे. ‘…आणि मोठ्या बहिणीसाठी पोज देण्याची वेळ आहे’ असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

सध्या कतरिना घरात बहिणीसोबत वेळ घालवताना दिसत आहे. ती वेगवेगळे पदार्थ बनवत असल्याचे दिसत आहे. तसेच ती योग आणि वर्कआऊटचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना देखील दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 5:27 pm

Web Title: katrina kaif clicks photo of sister isabella gone viral avb 95



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)