KGF 2 Fan Made Film Trailers viral on Social media mppg 94 | KGF 2 च्या उत्सुकतेपोटी निर्मात्यांच्या आधी चाहत्यांनीच केली ‘ही’ गोष्ट

0
22
Spread the love

‘केजीएफ चॅप्टर – १’ हा आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय दाक्षिणात्य चित्रपटांपैकी एक आहे. सुपरस्टार यश अभिनित केजीएफने दोन आठवड्यांत तब्बल २०० कोटी रुपयांची कमाई केली होती. यावरुनच या चित्रपटाची क्रेझ आपल्या लक्षात येते. आता चाहते केजीएफच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहात आहेत. परंतु निर्मात्यांकडून या चित्रपटाबद्दल कुठलीही अपडेट मिळालेली नाही. परिणामी दुसऱ्या भागासाठी आतुर झालेल्या चाहत्यांनी स्वत:च KGF 2चे ट्रेलर तयार केले आहेत. हे फॅनमेड ट्रेलर सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

KGF 2 मध्ये अभिनेता संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारणार आहे. काही महिन्यांपूर्वी संजय दत्तने या आगामी चित्रपटाचा पोस्टर शेअर करुन याबाबत माहिती दिली होती. दुसरा भागाचा आवाका पहिल्या भागापेक्षाही अधिक मोठा असेल असं अभिनेता यशने सांगितलं होतं. त्या अनुशंगाने सध्या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरु आहे. हा चित्रपटही पहिल्या भागाप्रमाणेच हिंदी, तामिळ आणि कन्नड या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होईल. मात्र हा विलंब चाहत्यांच्या सहनशक्तीच्या पलिकडे गेला आहे. परिणामी त्यांनी स्वत:च ट्रेलर तयार करुन युट्यूबवर प्रदर्शित करण्यास सुरुवात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 4:48 pm

Web Title: kgf 2 fan made film trailers viral on social media mppg 94Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)