Kishori Pednekar: Kishori Pednekar: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर थेट कोविड वॉर्डात पोहचल्या अन् – mumbai mayor meets corona-infected patients in sion hospital

0
74
Spread the love

मुंबई: सायन येथील लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालयाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासमवेत आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनी आज भेट दिली. यावेळी महापौरांनी पीपीई किट परिधान करून थेट करोना बांधितांवर उपचार सुरू असलेल्या कक्षात जाऊन पाहणी केली तसेच प्रत्यक्ष करोना बाधितापर्यंत जाऊन वैयक्तिकरीत्या संवादही साधला. ( Mumbai Mayor Kishori Pednekar Visits Covid Ward )

वाचा: गणेशोत्सव: सिंधुदुर्गात ७ ऑगस्टनंतर प्रवेशबंदीचे ‘ते’ टिपण अखेर रद्द

महापौरांनी कोरोना बाधित रुग्णांची आस्थेने विचारपूस करताना उपचारांबाबत माहिती घेतली. महानगरपालिकेतर्फे याठिकाणी देण्यात आलेल्या सोयीसुविधेबद्दल आपण समाधानी आहात का? डॉक्टर, परिचारिका आपली नीट काळजी घेत आहेत ना? अशी विचारणा महापौरांनी रुग्णांना केली. त्यावर रुग्णांनी समाधान व्यक्त केले. जोपर्यंत आपला रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत याठिकाणी आपल्याला उपचार घ्यावे लागणार आहेत. आपण बरे झाल्यानंतर प्लाझमासाठी आपले रक्त हवे असल्यास आपण आपले रक्त देण्याची तयारी ठेवावी. आपल्या रक्तामुळे तीन जणांचे प्राण वाचण्यास मदत होईल, असे कळकळीचे आवाहन यावेळी महापौरांनी केले.

वाचा: ठाण्यात १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला; ‘ही’ आहेत कारणे

महापौरांनी त्याआधी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांच्या दालनात युनियनच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. महापालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच रुग्णालय कर्मचाऱ्यांची सुद्धा बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याची मागणी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांकडे यावेळी केली. याबाबत महापालिका आयुक्तांसोबत चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे महापौरांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यासोबतच रेल्वेच्या जलद थांब्यांवरून महापालिका रुग्णालयांपर्यंत थेट बस सेवा सुरू करण्याची मागणी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी महापौरांकडे केली. याबाबतसुद्धा महापालिका आयुक्त यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

वाचा: गणपतीला गावी जाण्यासाठी नियमांचे विघ्न; ‘हे’ आहेत कळीचे सवाल

करोना कक्षाला भेट दिल्यानंतर महापौरांनी कार्यरत असणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची दैनंदिन उपस्थिती रजिस्टर तपासणी करून त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची नोंद घेतली. तसेच आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या सूचना केल्या. जेणेकरून रुग्णसेवेमध्ये आपण कुठेही कमी पडता कामा नये, असे निर्देश उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना महापौरांनी दिले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ताप आल्याने महापौर पेडणेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती बरी झाल्यानंतर आता त्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. करोना साथीत आरोग्य यंत्रणा झटून काम करत असताना त्यांना हुरूप देण्यासाठी महापौर सातत्याने फिल्डवर जात आहेत. पूर्वाश्रमीच्या परिचारिका असलेल्या महापौरांनी सर्व प्रोटोकॉल बाजूला सारून करोना काळात नर्स म्हणूनही सेवा देत कर्मचाऱ्यांना बळ देण्याचं काम केलं.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)