kolhapur flood: पूर नियंत्रणासाठी त्रिस्तरीय समिती स्थापन करण्याचा पर्याय; महाराष्ट्र-कर्नाटकातील मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय – panel recommends to manage floods. kolhapur

0
25
Spread the love

म. टा. प्रतिनिधी, सांगली: महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमा भागातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांची संयुक्तपणे त्रिस्तरीय समिती स्थापन करण्याचा पर्याय दोन्ही राज्यातील मंत्र्यांच्या बैठकीत पुढे आला. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर बुधवारी पाटबंधारे मंत्री जयंत पाटील आणि कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत त्रिस्तरीय समितीचा पर्यायावर चर्चा झाली.

सांगली, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांसह कर्नाटकातील सीमा भागात येणारे पुराचे संकट टाळण्यासाठी दोन्ही राज्यातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वय समित्या उपयुक्त ठरतील. या समित्या इंजिनीयरस्तरीय, सचिवस्तरीय व मंत्रीस्तरीय असतील, अशी माहिती पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांनी दिली. पूर येण्याआधी दोन्ही राज्यांना अलर्ट कसा दिला जाऊ शकतो याबाबतीतही बैठकीत चर्चा झाली.

दुष्काळी भागासाठी कर्नाटकातील पाण्याचा विचार

महाराष्ट्रातून कर्नाटकाला सोडल्या जाणाऱ्या पाण्याच्या बदल्यात कर्नाटकातील काही पाणी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला मिळावे याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. दोन्ही राज्यातील चर्चेनंतर हा प्रश्न निकाली निघेल असा विश्वास पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)