Konkan Ganeshotsav: Konkan Ganeshotsav: सिंधुदुर्गात ७ ऑगस्टनंतर प्रवेशबंदीचे ‘ते’ टिपण अखेर रद्द – relief on entry ban in sindhudurg after 7 august for ganeshotsav

0
40
Spread the love

सिंधुदुर्ग: परजिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी यायचे असेल तर ७ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत पोहचावे. त्यानंतर कोणालाही जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. गृह विलगीकरणाचे नियम मोडल्यास वा ई-पासशिवाय जिल्ह्यात प्रवेश कल्यास ५ हजार रुपये दंड वसूल केला जाईल, अशा प्रकारचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या बैठकीतील इतिवृत्त समोर आल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. हा अंतिम आदेश नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यानंतरही चाकरमान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता. त्या वादावर आज पडदा टाकण्यात आला. ( Konkan Ganeshotsav )

वाचा: गणपतीला गावी जाण्यासाठी नियमांचे विघ्न; ‘हे’ आहेत कळीचे सवाल

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीतील संबंधित वादग्रस्त टिपण आज रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांनी झूम अॅपद्वारे जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक घेतली. यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, आमदार वैभव नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे आदी उपस्थित होते. यावेळी चाकरमान्यांना गणेशोत्सव कालावधीत जिल्ह्यात येण्यास डेडलाइन ठरवणाऱ्या व प्रवेशबंदीचे संकेत देणाऱ्या टिपणवर चर्चा झाली. त्यानंतर सदर वादग्रस्त टिपण रदद् करण्याचे आदेश देण्यात आले. याबाबत खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

वाचा: गणेशोत्सावात चाकरमान्यांना ‘कोकणबंदी’ केल्यास तीव्र आंदोलन

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीतील इतिवृत्तावरून बरंच वादळ उठलं आहे. त्यावर भाजपचे राज्यसभा सदस्य व कोकणातील नेते नारायण राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. गणेशोत्सव आणि कोकणी माणसाचं अतूट नातं आहे. त्यामुळे गणेशोत्सवात चाकरमान्यांना कोकणात जायला बंदी घालू नये. सरकारने कोकणात जायला बंदी घातल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राणे यांनी दिला. त्याआधी आमदार आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला. ‘लालबागच्या राजाची आणि भक्तांची ताटातूट करू नका, तसेच कोकणातील चाकरमान्यांची आणि बाप्पाची भेट कशी होणार? याची आम्ही सरकारकडे विचारणा केली होती. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना पुढे करुन चाकरमान्यांची कोंडी करण्याचा प्लॅन तयार केला? परस्पर घोषणा केली? सरकारला हे मान्य ?’ असं ट्विट करत या संपूर्ण गोंधळावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या पार्श्वभूमीवर वाद अधिक न वाढवता संबंधित वादग्रस्त टिपण रद्द करण्यात आले आहे.

वाचा: गणपतीला चाकरमानी येणार!; सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणाले

बैठकीच्या इतिवृत्तात काय म्हटलंय?

– परजिल्ह्यांतून सिंधुदुर्गात येणाऱ्या गणेशभक्तांना ७ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंतच प्रवेश देण्यात येईल.
– गृह विलगीकरणाचे नियम मोडणे, ई-पासशिवाय जिल्ह्यात प्रवेश करणे इत्यादी कारणांसाठी ५ हजार रुपये दंड.
– गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करू नये. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच खरेदी उरकावी.
– जिल्ह्यात ३२ सार्वजनिक गणपती असून गणपतीची उंची यंदा कमी ठेवण्यात यावी तसेच बाकी मोठे कार्यक्रम, मिरवणुका करू नयेत.
– गणेशोत्सवात गावात वाडीवाडी मध्ये एकत्र येऊन भजन, आरती न करता घरातील सदस्यांनीच भजन व आरती करावी. सत्यनारायण महापूजा, डबलबारी भजनांचे आयोजन करण्यात येऊ नये. यावर गाव नियंत्रण समितीने लक्ष ठेवावे.
– गणपती विसर्जनावेळी एका गणपतीसोबत कुटुंबातील २ सदस्यांनीच उपस्थित राहावे. विसर्जनावेळी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करावे. विसर्जन मिरवणुका टाळाव्यात. यावरही गाव समितीचे लक्ष असणे आवश्यक आहे.
– गणेशोत्सवादरम्यान एकमेकांच्या घरी गणपती दर्शनासाठी जाऊ नये.
– गणेश विसर्जनादिवशी सिंधुदुर्गात दुपारचं जेवण अर्थात म्हामंद प्रथा आहे. ते यंदा घरातील लोकांनीच करावे. अन्य कुणाला घरी बोलावू नये.
– राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी यांनी गणेशभक्तांसाठी विशेष बसव्यवस्था करू नये.
– बाहेरून जिल्ह्यातील गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ग्रामस्तरीय समितीकडे नोंद असणे आवशयक आहे. या प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी केली जावी.
– गणपतीची पूजा स्वत:च करावी. पुरोहितामार्फत पूजा करण्यासाठी ऑलनाइन पूजेचा पर्याय निवडावा.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)