Kulgam Encounter Update: काश्मीर: कुलगाम येथे चकमक; १ दहशतवादी ठार, १ जवान जखमी – Encounter Broke Out Between Security Forces And Terrorists In Kulgam District Of Jammu And Kashmir

0
22
Spread the love

श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. तर या चकमकीत सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला आहे. दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील आरा भागात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी या भागाला घेराव घातला. त्यानंतर या भागात शोधमोहीम हाती घेतली. दहशतवाद्यांचा शोध घेत असताना लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांच्या दिशेने गोळीबार करणे सुरू केले.

याबाबत माहिती देताना सैन्यदलातील अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दलाचे जवान या भागात पोहोचले आणि त्यांनी शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळ्या झाडणे सुरू केले. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रत्यु्त्तरादाखल गोळीबार सुरू केल्यानंतर चकमक सुरू झाली. यात एक दहशतवादी ठार झाला. या चकमकीदरम्यान भारतीय सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

राजौरी येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे सापडली

तर दुसरीकडे राजौरी भागात सुरक्षा दलाच्या एका अभियानांतर्गत दहशतवाद्यांच्या विविध ठिकाणांवरून सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला. या जप्त करण्यात आलेल्या शस्त्रात्रांमध्ये शस्त्रे आणि दारुगोळा, बॅरल ग्रेनेड लॉन्चर (यूबीजीएल), ११ यूबीजीएल ग्रेनेड, १४ एके मॅगझीन, १ मॅगझीनसह चीनी पिस्तुले, चीनी ग्रेनेड १, आयआयडी तयार करण्यासाठी वापरण्या येणाऱ्या इतर वस्तूंसह डेटोनेटर, प्रेशर माइन २, पिका राउंड ६ आणि एका एके राउंड ९२० अशा शस्त्रांस्त्रांचा समावेश आहे.

वाचा: काश्मीर: सीआरपीएफ गस्ती पथकावर मोठा दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद, १ नागरिक ठार

तर १ जुलैच्या सकाळी जम्मू आणि काश्मीरमधील सोपोर येथे सुरक्षा दलाच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) १ जवान शहीद झाला असून २ जवान जखमी झाला. तर या दहशतवादी हल्ल्यात सोपोरमधील एका नागरिकाचाही मृत्यू झाला होता. गेल्या महिन्याभराच्या काळात जम्मू आणि काश्मीरमधील विविध भागांमध्ये सुरक्षादले आणि दहशतवाद्यांमध्ये १८ चकमकी झाल्या. यात एकूण ५१ दहशतवादी मारले गेले. तर या महिन्यात १ जलैला झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला होता.

वाचा: अनंतनागमध्ये २ दहशतवादी ठार; २४ तासांत ५ दहशतवाद्यांचा खात्मा

वाचा: ‘त्राल’नंतर ‘डोडा’ जिल्ह्याचीही दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटका!

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)