kushal badrike funny post on shooting resumed of chala hawa yeu dya | मेकअप करतोय की दिवाळीचा फटाका लावतोय?; कुशल बद्रिकेला पडला प्रश्न

0
24
Spread the love

जवळपास तीन महिन्यांनंतर अनेक मालिकांच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. सरकारने काही नियम आखून देत शूटिंग सुरू करण्याची परवानगी दिली आहे. सेटवर मोजकी लोकं, मास्क व सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन अशा अनेक गोष्टी या नियमांमध्ये आहेत. छोट्या पडद्यावर लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’च्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे. कुशल बद्रिके व श्रेया बुगडे यांनी शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोसोबत कुशलने लिहिलेलं कॅप्शन मात्र नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे.

‘आज चार महिन्याने हा माझ्या चेहऱ्याला मेकअप करतोय. मेकअप करतोय का दिवाळीचा फटाका लावतोय काय माहित’, असं मजेशीर कॅप्शन कुशलने त्याच्या फोटोला दिलं आहे. या फोटोत पीपीई किट घालून मेकअप आर्टिस्ट कुशलचा मेकअप करताना दिसतोय. मेकअप करताना त्याने पाळलेलं सोशल डिस्टन्सिंग पाहून कुशलला दिवाळीला फटाका लावत असताना कसे लांब उभे राहतो त्याची आठवण झाली.

प्रेक्षकांच्या या आवडत्या कार्यक्रमाचं शूटिंग जरी चालू झालं असलं तरी या कार्यक्रमाच्या चित्रीकरणात प्रेक्षकांना सहभागी होता येणार नाही. याबद्दल बोलताना कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे म्हणाली, “येत्या काळात ‘न्यू नॉर्मल’मध्ये प्रेक्षकांची प्रत्यक्ष दाद आम्हाला स्टुडिओत अनुभवता येणार नाही. खरंतर आमच्यासाठी प्रेक्षक खूप महत्वाचे आहेत. आम्ही त्यांना नक्कीच मिस करू. त्यांच्याशिवाय सादरीकरण करणं हे आम्हा कलाकारांसाठी निश्चितच आव्हानात्मक असणार आहे. थोडे तांत्रिक बदल करून, वेगळ्या प्रकारची स्किट्स आम्ही सादर करू. प्रेक्षकांसाठी हास्यविनोदाची रसरशीत मेजवानी घेऊन येण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मनोरंजनाचा दर्जा उत्तमच असेल याची मी खात्री देते.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 6:29 pm

Web Title: kushal badrike funny post on shooting resumed of chala hawa yeu dya ssv 92Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)