Lawyer’s complaint that he threatened to withdraw Kalpanaraje Bhosale’s lawyer’s letter msr 87|कल्पनाराजे भोसले यांचे वकीलपत्र मागे घेण्यासाठी धमकी दिल्याची वकिलाची तक्रार

0
76
Spread the love

भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री  कल्पनाराजे भोसले यांचे वकीलपत्र मागे घेण्यासाठी धमकी दिल्याची, एका वकिलाची तक्रार सातारा पोलिसात दाखल करण्यात आली आहे. कल्पनाराजे भोसले यांचे खटल्यात दाखल केलेले वकीलपत्र काढून घेण्यासाठी येथील एका वकिलाला काठीने मारहाण केल्याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अशोक यशवंतराव बडवे (रा. प्रतापगंज पेठ, सातारा) असे मारहाण झालेल्या वकिलाचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अशोक बडवे यांनी कल्पनाराजे भोसले यांच्यामार्फत एका खटल्यात वकीलपत्र घेतले होते. त्यांच्यामार्फत घेतलेले वकीलपत्र रद्द करा व न्यायालयीन कामकाजातून बाहेर व्हा, अन्यथा तुम्हाला कायमचे संपवू, असे म्हणत त्यांनी काठीने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे, बडवे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार पाटील याप्रकरणी तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 2:34 pm

Web Title: lawyers complaint that he threatened to withdraw kalpanaraje bhosales lawyers letter msr 87Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)