Lockdown in Chimur, Bhadravati and Brahmapuri in Chandrapur district msr 87|चंद्रपूर जिल्हातील चिमूर, भद्रावती व ब्रह्मपुरी शहरात लॉकडाउन

0
29
Spread the love

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बाधितांची संख्या १२५ व पुण्याचे तीन मिळून १२८ वर गेली असून, ग्रामीण भागात करोनाबाधितांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.  जिल्ह्यातील चिमूर, भद्रावती आणि ब्रह्मपुरी या तीन शहरांमध्ये लॉकडाउन घोषित केलेले आहे.

जीवनावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा सोडून इतर सर्व व्यवहार हे बंद करण्यात आलेले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे. लॉकडाउन दरम्यान, खासगी व सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी संपूर्णपणे मनाई असणार आहे.

जिल्हाधिकारी यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून बाहेरून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक वि गीकरण बंधनकारक आहे. या नागरिकांची आरोग्य तपासणी व नोंद केली जात आहे. संस्थात्मक विलगीकरणात दाखल झालेले नागरिकांचे पाच दिवसात स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात येतात. स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्यास पुढील दहा दिवसात त्या नागरिकाला गृह विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरणानंतर गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 10:09 pm

Web Title: lockdown in chimur bhadravati and brahmapuri in chandrapur district msr 87


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)