lt gen ravindra thodge passed away: निवृत्त लेफ्टनंट जनरल व विदर्भ डिफेन्स इण्डस्ट्रियल हबचे अध्यक्ष रवींद्र थोडगे यांचे निधन – lt gen ravindra thodge, pvsm, avsm, sm,vsm. passed away

0
27
Spread the love

नागपूर : लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) रवींद्र थोडगे (वय ६४) यांचे शुक्रवारी निधन झाले. भरत येथील त्यांच्या के-१४७ निवासस्थानावरून त्यांची अंत्ययात्रा शनिवार, ११ जुलैला सकाळी १०.३० वाजता निघेल. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन, मुले व मोठा आप्तपरिवार आहे. सैन्यदलातील अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम या सन्मानाचे ते मानकरी होते.

लॉकडाऊनच्या फेऱ्यात पुणेकर; करोनाचे ‘हे’ आकडे धोक्याचे

सैन्यदलात त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविली. सातारा येथील सैनिक शाळेचे माजी विद्यार्थी व नॅशनल डिफेन्स अकादमीतून अधिकारी म्हणून ते भारतीय सैन्य दलात रुजू झालेत. १९९९मध्ये झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या कारगिल युद्धात त्यांचा सहभाग होता. त्यांच्या नेतृत्त्वातील सियाचीन भागातील बटालियनने युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली. सैन्यदलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते काही काळ भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर नेमण्यात आलेल्या प्रशासक मंडळावरही होते. ते विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रियल हब प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संस्थापकही होते.

कॉमेडी शोमध्ये शिवरायांची थट्टा; मनसेकडून स्टुडिओची तोडफोड

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)