lulia Vantur was asked to choose between Salman Khan, Arbaaz and Sohail avb 95

0
32
Spread the love

अभिनेत्री, सुत्रसंचालक, मॉडेल लूलिया वंतूर सलमान खानमुळे चर्चेत आली होती. लूलिया वंतूर जेव्हा जेव्हा सलमान खानसोबत दिसली तेव्हा तेव्हा प्रसारमाध्यमांनी या विषयाला उचलून धरले होते. सलमान खानची बहुचर्चित प्रेयसी म्हणून लूलिया चर्चेत असते. पण अद्याप दोघांनीही त्यांच्या नात्याची अधिकृत माहिती दिलेली नाही. नुकताच लूलियाला सोशल मीडियावर सलमान खान, सोहेल खान आणि अरबाज खान यांच्यामधील एकाची निवड करण्यास सांगण्यात आले होते. लूलियाने दिलेल्या उत्तराने सर्वांची मने जिंकली आहेत.

नुकताच लूलियाने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी तिने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. एका चाहत्याने तिला सलमान, सोहेल आणि अरबाज या तिघांमधील एकाची निवड करण्यास सांगितले होते. त्यावर लूलियाने भन्नाट उत्तर दिले आहे. तिने ‘खान’ असा त्यावर रिप्लाय दिला आहे. तिच्या या उत्तराने तिने अनेकांची मने जिंकली आहेत.

लॉकडाउनमध्ये लूलिया सलमानसोबत त्याच्या फार्म हाऊसवर वेळ घालवताना दिसत होती. दरम्यान तिने तेथील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. तसेच निसर्ग चक्रिवादळानंतर सलमानच्या फार्महाऊसवर लूलिया साफसफाई करताना दिसली होती. लूलियासोबतच जॅकलिन फर्नांडिस, वलूशा डीसूजा देखील सलमानसोबत फार्म हाऊसवर राहत होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 11:12 am

Web Title: lulia vantur was asked to choose between salman khan arbaaz and sohail avb 95Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)