‘Mahajobs’ binding on new investors abn 97 | ‘नवीन गुंतवणूकदारांना नोकरभरतीसाठी ‘महाजॉब्स’ बंधनकारक’

0
26
Spread the love

उद्योगक्षेत्रात रोजगार मिळवण्यासाठी उत्सुक उमेदवारांनी व नोकरी देणाऱ्या कं पन्यांनी महाजॉब्स संकेतस्थळाला दिलेला महाप्रतिसाद उत्साहवर्धक आहे. राज्य सरकारने नुकतेच विविध देशांतील कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले आहेत. या कंपन्यांमध्ये नोकरभरती करताना महाजॉब्समध्ये नोंदणी करणे बंधनकारक असेल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर केले. महाजॉब्सवरून ७५० जणांना आता भरती प्रक्रियेसाठी बोलावणेही आले आहे.

राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी सुरू केलेल्या महाजॉब्स संकेतस्थळाला राज्यातील नोकरी इच्छुक तरुणांनी महाप्रतिसाद दर्शविला आहे. त्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे.

यावर संनियंत्रण ठेवण्यासाठी एमआयडीसीला स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. नोंदणी करणाऱ्या इच्छुकांना नोकरी मिळेपर्यंत पाठपुरावा केला जाईल. सध्या कार्यरत असलेल्या कंपन्यांमध्ये उपलब्ध रोजगार या संके तस्थळावरून मिळतीलच. पण त्याचबरोबर महाराष्ट्रात नव्याने गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना आपल्या नोकरभरती प्रक्रि येत महाजॉब्सचा वापर करणे बंधनकारक असेल. राज्य सरकारने नुकतेच काही सामंजस्य करार केले. त्यांनाही नोकरभरतीसाठी महाजॉब्सचा वापर करावा लागेल. त्यामुळे भूमिुपत्रांना रोजगार मिळण्यासाठी या संकेतस्थळाचा चांगला उपयोग होईल, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

१ लाख २६, ९६१ जणांची नोंदणी

महाजॉब्सवर रोजगारासाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्या एक लाख २६ हजार ९६१ वर पोहोचली आहे. तर १०४२ कंपन्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १८ कंपन्यांनी बुधवारी १२०६ पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 12:27 am

Web Title: mahajobs binding on new investors abn 97Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)