Mahajobs website launched today abn 97 | भूमिपुत्रांसाठी रोजगारसंधी

0
21
Spread the love

राज्यातील भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करण्याच्या शिवसेनेच्या राजकीय धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी  ‘महाजॉब्स’ या संकेतस्थळाचे सोमवारी लोकार्पण होत आहे. उद्योगांना कामगार मिळण्याचा आणि कामगारांना रोजगारांच्या संधीची माहिती मिळण्याचा मार्ग यामुळे मोकळा होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता ‘महाजॉब्स’चे लोकार्पण होणार असून उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित राहतील. टाळेबंदीनंतर राज्यात सध्या ६५ हजार उद्योग सुरू झाले आहेत. तर अनेक नवे उद्योग येऊ घातले आहेत. नुकतेच राज्य शासनाने देश-विदेशातील विविध कंपन्यांसोबत सुमारे १७ हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. याखेरीज नवीन उद्योग सुरू करण्यासाठी महापरवाना देणे सुरू केले आहे. अशा स्थितीत उद्योगांत कुशल, अर्धकुशल तसेच अ-कुशल कामगारांची मागणी वाढली आहे. मध्यंतरी करोना आजाराच्या संसर्गामुळे  कामगारांचे मोठय़ा प्रमाणात स्थलांतर झाले आहे. हे कामगार परत कधी येतील, याची शाश्वती नाही. त्यामुळे उद्योगांना कामगाराचा तुटवडा भासू नये, तसेच स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी महाजॉब्स हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. यात उद्योग, कामगार व कौशल्ये विकास विभागाने काम केले आहे. स्थानिकांच्या हिताचे रक्षण करण्याचा दावा शिवसेना करत असते. त्या राजकीय भूमिके चे पालन केल्याचे श्रेय या संकतेस्थळामुळे शिवसेनेला मिळू शकेल.

रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी केवळ आपली माहिती महाजॉब्स संकेतस्थळावर द्यायची आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर विविध कंपन्यांकडून इच्छुकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. करोनाच्या काळात अत्यल्प वेळेत हे संके तस्थळ विकसित करण्यात आले आहे. याद्वारे स्थानिक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 12:51 am

Web Title: mahajobs website launched today abn 97Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)