maharashtra bjp vice president also from Kolhapur zws 70 | भाजप प्रदेशाध्यक्षपदाबरोबर उपाध्यक्षपदही कोल्हापूरला

0
24
Spread the love

कोल्हापुर : भाजप प्रदेश अध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. त्यामध्ये दादांनी त्यांच्या कोल्हापूर जिल्ह्याला उपाध्यक्षसह सहा जणांना संधी दिली आहे.

भाजपा प्रदेश सरचिटणीस आणि इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करून वरचे पद दिले आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात प्रदेश अध्यक्ष व उपाध्यक्ष ही दोन्ही पदे असणार आहेत.

अन्य निवडी याप्रमाणे — विनोद कांकानी (भाजपा प्रदेश व्यापारी विभाग प्रदेशाध्यक्ष),पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव (प्रदेश कार्यकारणी सदस्य) तर माजी खासदार धनंजय महाडिक, बाबा देसाई, हिंदुराव शेळके (कायम निमंत्रित सदस्य) यांच्या निवडी झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर महाडिक बंधूंनी भाजपात प्रवेश केला होता. धनंजय महाडिक यांच्याकडे उपाध्यक्ष होते, तर सांगलीचे सम्राट महाडिक यांना  प्रदेश कार्यकारणी सदस्यपद दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 3:37 am

Web Title: maharashtra bjp vice president also from kolhapur zws 70Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)