maharashtra government formed a committee to study rapid antibodies test and corona kit says minister rajesh tope | करोना संदर्भातील चाचण्या, किटचा अभ्यास करण्यासाठी समिती गठित

0
22
Spread the love

भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने करोना निदानासाठी शिफारस केलेल्या विविध रॅपीड अँटी बॉडीज चाचण्या किंवा किटचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत चार सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. विविध कंपन्यांनी उत्पादित केलेल्या किटचा अभ्यास करून समितीला दहा दिवसांच्या आत शासनाला अहवाल सादर करावा लागणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, प्रा. डॉ. अमिता जोशी हे समितीतील सदस्य असून आरोग्य संचालक समितीचे सदस्य सचिव आहेत. या संदर्भात शनिवारी आरोग्य विभागामार्फत शासन निर्णय जाहीर करण्यात आला.

समितीची कार्यकक्षा

आयसीएमआरने रॅपीड अँटी बॉडी चाचण्यांसाठी शिफारस केलेल्या विविध चाचणी प्रणाली, किट यांचा अभ्यास करून त्यापैकी सर्वच अथवा निवडक चाचणी प्रणालीचा आणि किटचा राज्यात वापर करण्याची शिफरस करण्याची जबाबदारी या समितीकडे असेल. या चाचण्या पोलीस, आरोग्य सेवेशी निगडीत संवर्ग, स्वच्छता कामगार तसेच सामान्य जनता यांच्यावर करायच्या की निवडक संवर्गावर करायच्या, याबाबत ही समिती शिफारस करेल. या बरोबरच शिफारस केलेल्या चाचण्या व किटच्या बाबतीत अभिव्यक्ती स्वारस्य (EOI) मसुदा तयार करून आरोग्य विभागाला तो सादर करण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 7:21 pm

Web Title: maharashtra government formed a committee to study rapid antibodies test and corona kit says minister rajesh tope vjb 91Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)