Maharashtra Lockdown in Thane’s Bhiwandi town extended till 19 july dmp 82| ठाणे जिल्ह्यातील आणखी एका शहरात लॉकडाउन १९ जुलैपर्यंत वाढवला

0
24
Spread the love

करोना व्हायरसचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील आणखी एका महापालिका क्षेत्रात लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आधीपासूनच सुरु असलेला लॉकडाउन आता आणखी वाढवण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्रात लॉकडाउन १९ जुलै पर्यंत वाढवण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी यासंबंधी आदेश दिला आहे. दोन जुलैपासून भिवंडीमध्ये लॉकडाउन सुरु आहे. पीटीआयने हे वृत्त दिले आहे.

ठाणे जिल्ह्यातील अन्य महापालिका क्षेत्रात तसेच ठाणे ग्रामीण भागात १९ जुलैपर्यंत लॉकडाउन आधीच वाढवण्यात आला आहे. शनिवारी रात्रीपर्यंत भिवंडीमध्ये करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २,७०१ होती तर आतापर्यंत करोनामुळे इथे १४४ जणांचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 8:14 pm

Web Title: maharashtra lockdown in thanes bhiwandi town extended till 19 july dmp 82Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)