Maharashtra police: Maharashtra Police: गुलाल उधळला, फटाके फुटले पण अंगावर अजून खाकी वर्दी नाही! – 387 candidates who have passed psi examination awaiting appointment

0
25
Spread the love

कोल्हापूर: अंतिम परीक्षेसह शारिरीक चाचणीत ते उत्तीर्ण झाले, पीएसआय झाल्याने गुलाल उधळून आनंद व्यक्त केला, अनेकांच्या दारात फटाके वाजले, गावोगावी सत्कार झाले. पण चार महिने झाले तरी अंगावर अजूनही पोलिसाची ना खाकी वर्दी आहे ना पोलीस स्टेशन. यामुळे राज्यातील तब्बल ३८७ तरुण नोकरीवर रूजू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. करोना संसर्गाचा दणका त्यांनाही बसला असल्याने त्यांची स्वप्नपूर्ती मात्र लांबत आहे. ( Maharashtra PSI Appointments )

वाचा: १४० नंबरने उडवली खळबळ; मुंबई पोलीस ‘त्या’ वाहिनीला दाखवणार हिसका

राज्यातील पोलीस दलात पीएसआय भरती साठी २८ फेब्रुवारी २०१८ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यानंतर १३ मे २०१८ रोजी चार लाखावर उमेदवारांनी पूर्वपरीक्षा दिली. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थ्यांची २६ ऑगस्ट व २ सप्टेंबर रोजी मुख्य परीक्षा झाली. त्याचा निकाल वर्षाने लागला. ६ नोव्हेंबर २०१९ ते २९ जानेवारी २०२० या दरम्यान शारिरीक चाचणी घेऊन अंतिम निकाल १७ मार्च रोजी जाहीर करण्यात आला. अंतिम निकालानुसार पीएसआय म्हणून ३८७ जण पात्र ठरले. त्यांची यादी झळकली. अनेक वर्षाचे स्वप्न पूर्ण झाल्याच्या आनंदात अनेकांनी पेढे वाटले, काहींच्या दारात चक्क फटाके उडाले. गुलालाची उधळण झाली. घरात आनंदाला भरते आले. अनेकांनी शाबासकी दिली. सत्कार समारंभाचे आयोजन झाले. या गोष्टीला तब्बल चार महिने उलटले तरी अजूनही या उत्तीर्णांच्या अंगावर खाकी वर्दी येण्याबाबत सरकारकडून कोणत्याच हालचाली सुरू नाहीत. यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर आहे.

वाचा: मुंबई पोलिस दलात फेरबदल; पोलिस उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या

जाहिरात आल्यापासून ते निकाल लागेपर्यंत अडीच वर्षाचा कालावधी गेला. एका परीक्षेसाठी अडीच वर्षे गेल्यानंतर आता नोकरीची आस लागली आहे. पण चार महिन्यानंतरही त्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस पत्र दिले नाही. सरकारने आयोगाकडे प्रस्तावच दिला नाही. यामुळे ही भरती रखडली आहे. करोना च्या पार्श्वभूमीवर या भरतीकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. त्याचा फटका मात्र या मुलांना बसत आहे. राज्यात सांगली जिल्ह्यातील तुरची व नाशिक येथे पीएसआय प्रशिक्षण केंद्र आहे. सध्या तेथे २०१७ ची बॅच प्रशिक्षण घेत आहे. त्यांचा अजून सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. ते जेव्हा अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाले, तेव्हा देखील त्यांना वर्षभर घरी थांबवल्यानंतरच प्रशिक्षणाला पाठवण्यात आले. तीच अवस्था यावर्षी उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींच्या बाबतीत झाली आहे.

वाचा: लॉकडाऊनच्या फेऱ्यात पुणेकर; करोनाचे ‘हे’ आकडे धोक्याचे

एकीकडे महाराष्ट्र पोलीस दलात पीएसआय पदे रिक्त आहेत. पोलीस दलातच खात्याअंतर्गत परीक्षेत उत्तीर्ण झालेले ६३६ पोलीस बढतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांचे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. याचवेळी यावर्षी उत्तीर्ण झालेल्या ३८७ युवकांना सेवेत सहभागी करून घेतले जात नसल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. पीएसआय झाल्याने ते इतर खासगी नोकरी करू शकत नाहीत आणि इकडे हक्काची नोकरी मिळेना अशा विचित्र कात्रीत ते अडकलेत.

पोलीस दलात पीएसआय च्या जागा रिक्त आहेत. आम्ही उत्तीर्ण होऊन चार महिने झाले तरी आम्हाला सेवेत घेण्यासाठी टाळाटाळ होत आहे. सरकारने तातडीने यामध्ये लक्ष घालून आमचा प्रश्न सोडवावा – सुरज आमते, उत्तीर्ण परीक्षार्थी

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)