Maharashtra reported 7,827 new COVID-19 cases and 173 deaths in the last 24 hours msr 87|राज्यात २४ तासांत ७ हजार ८२७ नवे करोनाबाधित, १७३ जणांचा मृत्यू

0
91
Spread the love

देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अद्यापही वाढतच आहे. मागील २४ तासांत राज्यभरात ७ हजार ८२७ नवे करोना रुग्ण आढळले तर १७३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या २ लाख ५४ हजार ४२७ वर पोहचली आहे.

आजपर्यंत  राज्यात १ लाख ४० हजार ३२५ जणांनी करोनावर मात केली आहे. तर, १० हजार २८९ जणांचा आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्य आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशभरात २४ तासांत २८ हजार ६३७ नव्या करोना रुग्णांची भर पडली आहे. तर ५५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या आठ लाख ४९ हजार ५५३ इतकी झाली आहे. ५ लाख ३४ हजार ६२१ रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. तर २ लाख ९२ हजार २५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात आतापर्यंत २२ हजार ६७४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

करोना व्हायरसला रोखणारी लस बनवण्यासाठी जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. पण सध्याच्या घडीला यामध्ये रशियाने बाजी मारल्याचे दिसत आहे. रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने करोना व्हायरसवर बनवलेली लस सर्व क्लिनिकल चाचण्यांमध्ये यशस्वी ठरली आहे. विद्यापीठानेच तसा दावा केला आहे. सध्या संपूर्ण जग करोना व्हायरसमुळे त्रस्त आहे. या आजारामुळे अर्थचक्र सुद्धा ठप्प झाले आहे. त्यामुळे करोनाला रोखणारी लस कधी उपलब्ध होणार, याकडे सगळयांचेच लक्ष लागले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 7:13 pm

Web Title: maharashtra reported 7827 new covid 19 cases and 173 deaths in the last 24 hours msr 87


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)