Man arrested for murder of elder brother in Thane zws 70 | अपमानित केल्याने भावाची हत्या

0
49
Spread the love

ठाणे : दुकानातील नोकरांसमोर अपमान करतो, तसेच इच्छेविरुद्ध काम करतो. या रागातून लहान भावाने मोठय़ा भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी कोपरीमध्ये उघडकीस आला आहे.

महेश चावला (४८) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी महेशचा भाऊ अनिल चावला (४५) आणि दुकानातील नोकर अभय अग्निहोत्री (१९), शोबीत सिंह (१९) यांना अटक केली आहे. हत्येनंतर महेशचा मृत्यू दुकानातील शिडीवरून पडून झाल्याचा बनाव अनिलने रचला होता. मात्र, पोलिसांच्या तपासात त्याचे हे बिंग फुटले.

कोपरी येथील गावदेवी मंदिर परिसरात महेश आणि अनिलचे मे. रतन सुपरमार्केट नावाचे एकमजली दुकान आहे. दुकानाच्या पहिल्या मजल्यावर अनिल चावला राहतो, तर महेश हा कोपरीमधील किशोरनगर परिसरात पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतो. दुकानाच्या कारभारावरून महेश आणि अनिलमध्ये वारंवार वाद होत असे. यातून नोकरांसमोर अनिलला अपमानित व्हावे लागत होते. त्यामुळे अनिलने २ जुलैला सायंकाळी महेशच्या हत्येचा कट रचला. त्याने दुकानातील नोकर अभय आणि शोबीत सिंह यांना बोलावून घेतले. त्यानंतर महेश हा दुकानात असताना दुकानातील सीसीटीव्ही बंद करून अनिलने महेशच्या डोक्यात लोखंडी वस्तूने हल्ला केला. या घटनेत महेशचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर  शिडीवरून पडून मृत्यू झाल्याचा बनाव पोलिसांसमोर रचला. मात्र, तपासात त्याचे हे बिंग फुटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 4:00 am

Web Title: man arrested for murder of elder brother in thane zws 70Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)