Man shoots his mother for delay in dinner dmp 82| जेवण वाढायला विलंब केला म्हणून मुलाने आईची गोळी झाडून केली हत्या

0
15
Spread the love

आईने रात्रीचे जेवण वाढायला उशीर केला म्हणून चिडलेल्या मुलाने आईची गोळी झाडून हत्या केली. दिल्लीच्या बवाना इंडस्ट्रीयल इस्टेट भागात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. घटनेच्यावेळी आरोपी सूरजने (२६) मोठया प्रमाणात मद्य प्राशन केले होते अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीला शस्त्रासह अटक केली आहे.

दारुच्या नशेत घरी परतल्यानंतर सूरजने आईला जेवण वाढायला सांगितले. पण आईने नकार दिला. तिने सूरजला शुद्धीवर आल्यानंतर घरी यायला सांगितले. त्यावरुन दोघांमध्ये वादावादी झाली. काही वेळाने तिने सूरजला जेवण वाढले. पण पुन्हा त्यांच्यात वाद सुरु झाला. तेव्हा सूरजने त्याच्याजवळच्या बंदुकीतून आईवर गोळी झाडली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

गोळीचा आवाज ऐकून शेजारी त्याच्या घराच्या दिशेने धावले व त्यांनी तिथून पळून जाणाऱ्या सूरजला पकडले. पोलिसांच्या ताब्यात देण्याआधी त्यांनी सूरजला मारहाण केली. सूरजा एका फॅक्टरीमध्ये काम करतो. त्याने ओळखीच्या एका व्यक्ती जवळून ही पिस्तुल मिळवली होती असे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 3:08 pm

Web Title: man shoots his mother for delay in dinner dmp 82Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)