marriage in Betul district: एकाच मंडपात दोघींशी लग्न; एक गर्लफ्रेंड तर दुसरी घरच्यांच्या पसंतीची – a man married his girlfriend & bride chosen by his family in the same mandap

0
81
Spread the love

भोपाळः मध्य प्रदेशातील बेतुल जिल्ह्यात अगळेवेगळे लग्न झाले. एका तरुणाने एकाच मंडपात दोन तरुणींसोबत लग्नाचे फेरे घेतले. या लग्नाची राज्यात जोरदार चर्चा आहे. या लग्नाचे फोटोही व्हायरल झाले आहेत. आता जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली आहे.

बेतुल जिल्ह्यातील घोडाडोंगरी भागातील केरिया गावात २९ जूनला हे लग्न झाले. तरुणाचे एका मुलीवर प्रेम होते. दुसरी मुलगी ही घरच्यांच्या पसंतीची होती. यामुळे त्याने दोघींशी एका मंडपात लग्नाचे फेरे घेतले.

भोपाळमध्ये तरुणीच्या प्रेमात

केरिया गावातील राहणारा संदीप ज्या दोन मुलींशी लग्न केलं त्यातील एक होशंगाबाद जिल्ह्यातील आहे. तर दुसरी मुलगी ही घोडाडोंगरी भागातील कोयलारी गावातील राहणारी आहे. भोपाळमध्ये शिक्षण घेत असताना संदीप होशंगाबादमधील तरुणीच्या प्रेमात पडला.

पंचायतीने घेतला निर्णय

संदीप हा गर्लफ्रेंडबरोबर लग्न करण्यास ठाम होता. तर कुटुंबीयांनी त्यांच्या पसंतीच्या मुलीशी संदीपने लग्न करावे, असा आग्रह धरला होता. यामुळे हे प्रकरण वाढत गेलं. अखेर या पंचायत बोलावण्यात आली. दोन्ही मुली संदीपसोबत राहण्यास तयार असतील तर त्यांचं त्याच्याशी लग्न करून टाकावं, असा निर्णय पंचायतीत झाला. या निर्णयावर दोन्ही मुलींनी होकार दिला.

हार्दिक पटेल गुजरात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी, भाजपला घेरण्याची तयारी

तिघांच्याही कुटुंबांची हरकत नाही

लग्न हे केरिया गावात झालं. यात नवरदेवासह दोन्ही नवरींचे कुटुंबीय आणि गावातील नागरिक सहभागी झाले होते. तिघांच्या कुटुबींयांना या लग्नावर कुठलाही आक्षेप नव्हता. त्यांनी स्वतः पुढे जाण्याचा निर्णय घेतला, असं पंचायतीचे उपाध्यक्ष आणि लग्नाचे साक्षीदार असलेले मिश्रीलाल परते यांनी सांगितलं.

पाकिस्तानी सैन्याच्या BAT चा हल्ल्याचा कट, LoC वर सुरक्षा दलांना हाय अलर्ट

जिल्हा प्रशासनाने घेतली दखल

हिंदू कायद्यानुसार बहुविवाहाला परवानगी नाहीए. यामुळे हा गुन्हा ठरतो. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना आपण या प्रकरणी लक्ष घालण्याच्या सूचना करणार असल्याचं घोडडोंगरीच्या तहसिलदार मोनिका विश्वकर्मा यांनी सांगितलं.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)