milap zaveri on kamal rashid khan fake behavior avb 95

0
34
Spread the love

कमाल आर खानचे प्रत्येक ट्विट चर्चेचा विषय ठरते. विविध विषयांवर कोणीही विचारले नसताना हा स्वयंघोषित चित्रपट समीक्षक त्याची मते मांडताना दिसतो. सेलिब्रिटी त्याच्या ट्विटकडे फारसे लक्ष देत नसले तरी नेटकरी मात्र त्याच्या ट्विटची आतुरतेने वाट पाहात असतात. त्याला अनेक वेळा ट्रोल करतात. १४ जून रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली. बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्याने आत्महत्या केली असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. अशातच केआरकेने या चर्चांना दुजोरा देत एक व्हिडीओ शेअर केला होता. आता दिग्दर्शक मिलाप जावेरी यांनी केआरकेवर निशाणा साधला आहे. त्यांनी केआरकेचे काही वर्षांपूर्वीचे सुशांत विषयीचे मत आणि आताचे मत आधोरेखीत केले आहे.

मिलाप यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी काही दिवसांपापूर्वी सुशांतच्या बाजून बोलणाऱ्या केआरकेचे धक्कादायक वक्तव समोर आणले आहे. या व्हिडीओमध्ये केआरके सुशांतला अभिनय येतच नाही आणि एकता कपूरला त्यासाठी शिक्षा द्यायला हवी. कारण तिनेच सुशांतला लाँच केले आहे असे म्हटले.

पुढच्या व्हिडीओमध्ये केआरकेने सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यावेळी त्याने एक प्रश्न नेहमी विचारला जाईल की एक यशस्वी अभिनेता वयाच्या ३४व्या वर्षी आत्महत्या का करतो? सुशांतच्या जाण्याने मी खूप दु:खी आहे असे बोलताना दिसत आहे.

पाहा : शाहरुखच्या ‘मन्नत’पेक्षाही कमी नाही केआरकेचा ‘करोना फ्री बंगला’

केआरकेचे हे दोन्ही व्हिडीओ शेअर करत मिलाप यांनी केआरकेवर निशाणा साधला आहे. ‘हा आहे KRKचा खरा चेहरा. सुशांतच्या निधनानंतर खोटे खोटे अश्रू आणणारा. अशा लोकांना थांबवण्याची हीच खरी वेळ आली आहे’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 3:30 pm

Web Title: milap zaveri on kamal rashid khan fake behavior avb 95Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)