MLA Geeta Jain who is a corona positive celebrated her birthday in home quarantine aau 85 |करोना पॉझिटिव्ह असलेल्या आमदार गीता जैन यांनी साजरा केला वाढदिवस

0
32
Spread the love

मिरा भाईंदर शहराच्या अपक्ष आमदार गीता जैन याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. परंतू क्वारंटाइनमध्ये असतानाही त्यांनी वाढदिवस साजरा केल्यामुळे सर्वत्र चर्चचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे याप्रसंगी त्यांचे करोना पॉझिटिव्ह पती आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

मिरा भाईंदर शहरातील अपक्ष आमदार गीता जैन यांचा १ जुलै रोजी करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना १० दिवसांकरिता होम क्वारंटाइनचे निर्देश आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत ५ जुलै रोजी गीता जैन यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांच्यासोबत त्याचे करोना पॉझिटिव्ह पती आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

करोना पॉझिटिव्ह असताना आणि क्वारंटाइनचे आदेश असतानाही आमदार गीता जैन यांनी अशा प्रकारे कुटुंबियांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा केल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे प्रशासनाकडून सामान्य नागरिकांना होम क्वारंटाइनची परवानगी देत नसताना आमदारांकरिता वेगळा नियम लागू करण्यात आला आहे. त्याच आता आमदारांनी करोनाचे गांभीर्य लक्षात न घेता अशा प्रकारे वाढदिवस साजरा केल्यामुळे विरोधकांकडूनही संताप व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 5:06 pm

Web Title: mla geeta jain who is a corona positive celebrated her birthday in home quarantine aau 85


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)