modi gives app challenge: स्वावलंबी भारत: TiKToK ला टाळे ठोकत मोदींनी देशाला दिले ‘अॅप चॅलेन्ज’ – self reliant india pm modi invited youths of india to create new mobile apps after india banned chinese apps

0
30
Spread the love

नवी दिल्ली: चीनच्या कारवायाना उत्तर देण्यासाठी भारत सरकारने ५९ चीनी अॅप बॅन तर केलेच, परंतु आता एक पाऊल पुढे टाकत भारताला अॅप निर्मितीत स्वावलंबी बनवण्याची योजना तयार करणे सुरू केले आहे. पंतपप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी ट्विट करत देश आता स्वावलंबी भारत अॅप इनोव्हेशन चॅलेन्ड लॉन्च करत असल्याचे म्हटले आहे. आज मेड इन इंडिया अॅप तयार करण्यासाठी तांत्रिक आणि स्टार्टअप समुदायामध्ये मोठा उत्साह आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे. या मुळे @GoI_MeitY आणि @AIMtoInnovate हे संयुक्तपणे इनोव्हेशन चॅलेंज सुरू करत आहेत असे मोदी यांनी म्हटले आहे.

जर तुमच्याकडे असे एकादे प्रोडक्ट असेल, किंवा तुम्हाला वाटत असेल की आपल्याकडे काही चांगले करण्याचा दृष्टीकोन आणि क्षमता आहे, तर मग तुम्ही टेक कम्युनिटीला नक्कीच जोडले जा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी लिंक्डइनवर आपले हे विचार मांडले आहेत.

भारत सरकारने देशात लोकप्रिय झालेल्या चीनच्या अनेक अॅपवर बंदी घातली आहे. ही अॅप्स कमाईदेखील चांगली करत होते. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनच्या कारवाईनंतर दुखावलेल्या भारताने हे पाऊल उचललेल. या अॅपमध्ये अनेक तांत्रिक समस्या देखील होत्या. हे देखील ही अॅप बॅन करण्याचे एक कारण दिले जात आहे. भारताच्या या निर्णयानंतर चीनला तिळपापड झाला. भारताने ज्या चीनी अॅपवर बंदी घातली आहे, त्यांमध्ये टिकटॉक आणि यूसी ब्राउझर या भारतात अत्यंत लोकप्रिय अॅपचाही समावेश आहे. पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमावादानंतर भारताने ही कारवाई केली आहे.
लडाखच्या पूर्व भागातील गलवान खोऱ्याच चीनने कुरघोडी केल्यानंतर भारताने चीनी अॅपवर बंदी घालण्याचे पाऊल उचलले. हा निर्णय केंद्र सरकारने २९ जून या दिवशी घेतला. एक परिपत्रक जारी करत भारताने एकूण ५९ चीनी अॅपवर बंदी घातली असल्याचे जाहीर केले.

maharashtra times

पंतप्रधान नरेंद्र मोदी (संग्रहित छायाचित्र)

भारताने बंदी घातलेल्या आलेल्या अ‍ॅप्सची यादी

१. TikTok
२. Shareit
३. Kwai
४. UC Browser
५. Baidu map
६. Shein
७. Clash of Kings
८. DU battery saver
९. Helo
१०. Likee
११. YouCam makeup
१२. Mi Community
१३. CM Browers
१४. Virus Cleaner
१५. APUS Browser
१६. ROMWE
१७. Club Factory
१८. Newsdog
१९. Beutry Plus
२०. WeChat
२१. UC News
२२. QQ Mail
२३. Weibo
२४. Xender
२५. QQ Music
२६. QQ Newsfeed
२७. Bigo Live
२८. SelfieCity
२९. Mail Master
३०. Parallel Space
३१. Mi Video Call – Xiaomi
३२. WeSync
३३. ES File Explorer
३४. Viva Video – QU Video Inc
३५. Meitu
३६. Vigo Video
३७. New Video Status
३८. DU Recorder
३९. Vault- Hide
४०. Cache Cleaner DU App studio
४१. DU Cleaner
४२. DU Browser
४३. Hago Play With New Friends
४४. Cam Scanner
४५. Clean Master – Cheetah Mobile
४६. Wonder Camera
४७. Photo Wonder
४८. QQ Player
४९. We Meet
५०. Sweet Selfie
५१. Baidu Translate
५२. Vmate
५३. QQ International
५४. QQ Security Center
५५. QQ Launcher
५६. U Video
५७. V fly Status Video
५८. Mobile Legends
५९. DU Privacy

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)