Mukhtar Abbas Naqvis criticism of Rahul Gandhi and the Congress from the dynasty aau 85 |घराणेशाहीवरुन मुख्तार अब्बास नक्वी यांची राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका; म्हणाले…

0
17
Spread the love

भारत आणि चीनदरम्यान महिन्याभरापासून सीमावाद उफाळून आला आहे. यावरुन काँग्रेसने सातत्याने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आज (शनिवार) राहुल गांधी यांनी केंद्रावर पुन्हा एकदा निशाणा साधला. लडाखची जनता चीनच्या घुसखोरीविरोधात आवाज उठवत आहे. त्यांच्याकडे जर सरकारनं दुर्लक्ष केलं तर ते महागात पडू शकतं, असं त्यांनी म्हटलं आहे. यावर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी पलटवार केला आहे. त्यांनी म्हटलं, ‘काँग्रेस पक्ष हा पप्पू का घोंसला आणि परिवार का चोंचला’ बनलेला आहे.

नक्वी पुढे म्हणाले, “जेव्हा देशाचं सैन्यदल शत्रूला सडोतोड उत्तर देत असतं त्यावेळीच तुम्ही शत्रूला ऑक्सिजन पुरवण्याचं काम करीत असता. यामुळेच काँग्रेस पक्ष कमी होत चालला आहे. आज काँग्रेस पक्ष हा केवळ पप्पू का घोसला आणि परिवार का चोंचला बनून राहिला आहे.”

लडाखच्या जनतेच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष कराल तर महागात पडेल – राहुल गांधी

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर भारत-चीन सीमावादावरुन निशाणा साधला. ते म्हणाले, “लडाखची जनता चिनी घुसखोरीविरोधात आपला आवाज उठवत आहे आणि सरकारला आपला आवाज ऐकण्यास सांगत आहे. त्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे भारताला महागात पडू शकते.”

एका वृत्ताचा दाखला देताना राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात, “काही लडाखी लोक आरोप करीत आहेत की, चीनने लडाखमध्ये भारतीय जमिनीचा ताबा घेतला आहे. ही देशभक्त लडाखी जनता चिनी घुसखोरांविरोधात आवाज उठवत आहे. ते ओरडून सांगत आपल्याला इशारा देत आहेत. त्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे भारताला महागात पडू शकतं. देशासाठी तरी त्यांचं म्हणणं ऐकून घ्या.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 2:32 pm

Web Title: mukhtar abbas naqvis criticism of rahul gandhi and the congress from the dynasty aau 85Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)