mumbai news News : Coronavirus In Maharashtra: राज्यात आज १९८ करोनाबळी; ‘हा’ टक्का थोडासा दिलासा देणारा – maharashtra reported 6603 new covid-19 cases and 198 deaths today

0
20
Spread the love

मुंबई: राज्यात आज करोना संसर्गाने आणखी १९८ रुग्णांचा बळी घेतला असून मृतांचा एकूण आकडा ९४४८ इतका झाला आहे. गेल्या २४ तासांत करोना साथीच्या ६६०३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ४६३४ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत १ लाख २३ हजार १९२ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) एका टक्क्याने वाढून आता ५५.०६ टक्के इतके झाले आहे.

वाचा: ठाकरेंचा पुण्याच्या महापौरांना फोन; दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

महाराष्ट्रात करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या आज २ लाख २३ हजार ७२४ वर पोहचली. आतापर्यंत एकूण ११ लाख ९१ हजार ५४९ जणांची करोना चाचण्या राज्यात घेण्यात आल्या. त्यात १८.७७ टक्के नमुने करोना चाचणीसाठी पॉझिटिव्ह आले आहेत तर बाकीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ६ लाख ३८ हजार ७६२ जणांना होम क्वारंटाइन मध्ये ठेवण्यात आले आहे तर ४७ हजार ७२ जणांना संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.

वाचा: खासदार अमोल कोल्हे झाले होम क्वारंटाइन; ‘हे’ आहे कारण

राज्यात आज ६६०३ नवीन करोना बाधित रुग्णांची भर पडल्यानंतर प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्णांची एकूण संख्या ९१ हजार ६५ इतकी झाली आहे. त्यात सर्वाधिक ३० हजार ६३ रुग्ण ठाणे जिल्ह्यात आहेत. त्यानंतर मुंबईत २३ हजार ५४३ अॅक्टिव्ह रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात सध्या १५ हजार ९३२ अॅक्टिव्ह रुग्ण असून रायगड जिल्ह्यातले आकडेही चिंता वाढवणारे आहेत. रायगडमध्ये सध्या ३ हजार २९९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ठाण्याप्रमाणे या जिल्ह्यातही करोनारुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.

वाचा: ‘तोच’ माणूस असं काम करू शकतो: आव्हाड

राज्यात आज १९८ रुग्ण करोनाने दगावले असून त्यात सर्वाधिक ६२ रुग्ण मुंबईत दगावले आहेत. त्यानंतर ठाणे जिल्ह्यात २८ तर पुणे जिल्ह्यात २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा एकूण आकडा ९४४८ वर पोहचला आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)