My father and I remain in hospital till the doctors decide otherwise Abhishek Bachchan dmp 82| अमिताभ यांना किती दिवस रुग्णालयात ठेवणार? अभिषेकने टि्वट करुन दिली माहिती

0
22
Spread the love

महानायक अमिताभ बच्चन यांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बच्चन कुटुंबात एकूण चौघांना करोनाची लागण झाली आहे. अमिताभ यांचा मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या आणि नात आराध्या या तिघांचेही करोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

अभिषेक बच्चनवरही नानावटीमध्ये उपचार सुरु आहेत. अमिताभ बच्चन यांच्यामध्ये करोनाची सौम्य लक्षणे आहेत. ऐश्वर्या आणि आराध्या मात्र घरीच होम क्वारंटाइनमध्ये राहणार आहेत.

अमिताभ यांना नेमके किती दिवस रुग्णालयामध्ये ठेवणार? असा त्यांच्या कोटयावधी चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे. अभिषेक बच्चनने टि्वट करुन या संदर्भात माहिती दिली आहे. “मी आणि माझे वडिल किती दिवस रुग्णालयात राहणार ते सर्व डॉक्टरांवर अवलंबून आहे. प्रत्येकाने सावधगिरी बाळगून काळजी घ्यावी, कृपाकरुन नियमांचे पालन करा” असे अभिषेकने त्याच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यामध्ये करोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. ‘एएनआय’ने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. “अमिताभ बच्चन यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्या सौम्य लक्षणे आढळली आहेत. सध्या त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे”, असं नानावटी रुग्णालयाकडून माहिती मिळाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 9:03 pm

Web Title: my father and i remain in hospital till the doctors decide otherwise abhishek bachchan dmp 82Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)