Narayan Rane: narayan rane: मुलाखत घ्यायला शिवसेनेत नेते आहेत कुठे?; राणेंनी उडवली खिल्ली – bjp leader narayan rane reaction on sharad pawar interview in saamana

0
21
Spread the love

मुंबई:शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घेतलेल्या मुलाखतीची भाजप नेते नारायण राणे यांनी खिल्ली उडवली आहे. मुलाखत घेण्यासाठी शिवसेनेत नेते आहेत कुठे? कोणीच नाही म्हणून घेतली पवारांची मुलाखत; असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.

नारायण राणे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक सामनामध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दीर्घ मुलाखत छापून येत आहे. त्याकडे तुम्ही कसं पाहता? असा सवाल राणे यांना माध्यमांनी विचारला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांना हा टोला लगावला. चांगलं आहे. शरद पवार हे अनुभवी नेते आहेत. पूर्वी आधी ज्यांची मुलाखत यायची ते कुठून तरी माहिती गोळा करायचे आणि छापायचे. त्यात स्वत:चा विचारही नसायचा आणि अनुभवही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावतानाच शिवसेनेकडे मुलाखत घ्यायला नेते आहेत तरी कुठे? असा चिमटाही त्यांनी काढला. तसेच निदान पवार अनुभवी तरी आहेत. ते राज्याच्या आणि देशाच्या हिताचंच बोलतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी पवारांच्या मुलाखतीच्या एक शरद, सगळे गारद या शिर्षकावरही कोटी केली. एक शरद, शिवसेनेचे बाकी सगळे गारद, असा टोलाही त्यांनी लगावला. पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे किती वेळा एकमेकांना भेटतात याच्याशी काही घेणंदेणं नाही. ते दहावेळा भेटले तरी हरकत नाही. पण त्या भेटीतून काही निष्पन्न तरी होऊ द्या, असंही ते म्हणाले.

गणपतीला गावी जाण्यासाठी नियमांचे विघ्न; ‘हे’ आहेत कळीचे सवाल

महाविकास आघाडीतच अंतर्गत भांडणं सुरू आहेत. या आघाडीला सूचना करून ते माझं काहीही ऐकणार नाही. त्यांच्याच नेत्यांचं ते ऐकत नाहीत. ते बाहेरच्यांचं काय ऐकणार? असा सवाल करतानाच शिवसेनेचं राज्यात सरकार आलं असलं तरी त्याचा सामान्य शिवसैनिकांना काडीचा उपयोग नाही. शिवसेना पदाधिकाऱ्यांनाच विचारले जात नाही. तिथे सामान्य शिवसैनिकांची काय अवस्था असेल. या सरकारमधून शिवसैनिक हद्दपार झालेला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

maharashtra times

narayan rane : गणेशोत्सावात चाकरमान्यांना ‘कोकणबंदी’ केल्यास तीव्र आंदोलन; राणेंचा इशारा

करोना थांबेना! पुणे जिल्ह्यासाठी अजित पवारांचा धाडसी निर्णय

गणेशोत्सवाबाबत काय म्हणाले राणे?

चाकरमानी मुंबईत नोकरीला असले तरी त्यांचे कुटुंब कोकणात असते. त्यामुळे गणेशोत्सवात चाकरमानी कोकणात जात असतो. गणेशोत्सव कोकणी माणसांसाठी अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे. यंदा करोना असला तरी गणेशोत्सवात कोकणी माणसाला गावाला जायला कोणी बंदी घालू नये. अद्यापपर्यंत कोकणबंदीचे आदेश निघालेले नाहीत. आम्ही तसा आदेश निघू देणार नाही. कोकणात जायला बंदी घातल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राणे यांनी दिला. ज्यांचं कोकणात घर आहे. तो घराकडे जाणारच. त्यासाठी ई-पासची सक्ती वगैरे घालू नये. आमचा कोकणात जाण्यासाठी ई-पास सुरू करण्यासही विरोध राहील, असं ते म्हणाले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)