Nasser Hussain explains why team India fails to pass the knockout hurdle in ICC tournaments | टीम इंडिया बाद फेरीतच का अयशस्वी? नासिर हुसेनने सांगितलं कारण

0
31
Spread the love

टीम इंडिया हा एक यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. पण २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघाला एकही ICC च्या स्पर्धेचं विजेतेपद मिळवता आलेलं नाही. त्या स्पर्धेनंतर झालेल्या बऱ्याचशा स्पर्धांमध्ये भारताला बाद फेरीत गाशा गुंडाळावा लागला आहे. २०१३ नंतर भारताने केवळ २०१८ चा १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकला आहे. बाकीच्या सर्व स्पर्धांमध्ये भारताच्या पदरी निराशा आली. असं टीम इंडियाच्या बाबतीत का होतं? याचं कारण इंग्लंडचा माजी कर्णधार आणि क्रिकेट जाणकार नासिर हुसेन याने सांगितलं.

“या साऱ्या प्रकाराबद्दल विराट कोहली किती जबाबदार आहे हे मी सांगू शकत नाही. पण मला असं वाटतं की ICC च्या स्पर्धांसाठी केली जाणारी खेळाडूंची निवड आणि परदेशातील वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता यात भारतीय संघ कमी पडतो आहे. केवळ एका सामन्यासाठी नव्हे तर संपूर्ण स्पर्धेची व्यापकता लक्षात घेऊन या योजना आखल्या जायला हव्यात. जर तुम्ही विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी खेळत आहात. विराट आणि रोहित बाद झाल्यावर तुमच्या संघाची स्थिती २०-२ अशी होते त्यावेळी तुमचे मधल्या फळीतील गोलंदाज कुठे आहेत?”, असं हुसेन क्रिकेट कनेक्टेड कार्यक्रमात बोलताना म्हणाला.

भारतीय क्रिकेट बऱ्याच वेळा वरच्या फळीतील फलंदाजांवर अवलंबून राहते. खेळपट्टी चांगली असेल तर ते फलंदाज शतक ठोकतात. कोहली, रोहित सगळ्यांची शतके होतात. पण मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड, न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट हे सारे गोलंदाजीला आले आणि वरची फळी स्वस्तात माघारी परतली तर मात्र संघाची अवस्था बिकट होते. अशा वेळी चौथ्या क्रमांकाचा फलंदाज महत्त्वाचा असतो. केवळ प्लॅन A असून उपयोगाचा नसतो तर प्लॅन B देखील तयार असायला हवा”, हा महत्त्वाचा मुद्दाही हुसेनने अधोरेखित केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 9:21 am

Web Title: nasser hussain explains why team india fails to pass the knockout hurdle in icc tournaments vjb 91Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)