ncp leader sharad pawar speaks about shiv sena balasaheb thackeray congress bjp relations saamna interview | बाळासाहेबांची विचारधारा, कामाची पद्धत भाजपाशी सुसंगत कधी वाटलीच नाही : शरद पवार

0
31
Spread the love

“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सबंध विचारधारा, कामाची पद्धत ही भारतीय जनता पक्षाच्या विचाराशी सुसंगत होती असं मला कधी वाटलंच नाही,” असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं. “मला जे बाळासाहेब ठाकरे माहीत आहेत, माझ्यापेक्षा तुम्हा लोकांना कदाचित अधिक माहिती आहेत,” असं ते म्हणाले.

“बाळासाहेबांची भूमिका आणि भाजपची विचारधारा यात अंतर होतं. विशेषतः कामाच्या पद्धतीत बराच फरक आहे. बाळासाहेबांनी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, प्रमोद महाजन अशा काही व्यक्तींचा सन्मान केला. या सर्वांना त्यांनी सन्मानाने वागणूक देऊन त्यातून एकत्र येण्याचा विचार केला आणि पुढे सत्ता येण्यात हातभार लावला,” असं पवार यावेळी म्हणाले. सामनाचे संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली, या मुलखतीत शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं. “काँग्रेसशी बाळासाहेबांचा संघर्ष होता, पण तो काही कायमचा संघर्ष होता असं मला वाटत नाही. शिवसेना ही काँग्रेसच्या कायमच विरोधात होती असं नाही,” असंही ते म्हणाले.
जितके रोखठोक तितकेच दिलदार

पाहा व्हिडीओ

“बाळासाहेब ठाकरे हे जितके रोखठोक होते तितकेच ते दिलदारही होते. राजकारणात ही अशी दिलदारी दुर्मिळ आहे. कदाचित बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना ही या देशातील एकमेव संघटना अशी असेल की एखाद्या राष्ट्रीय प्रश्नावरून सत्ताधारी पक्षातल्या प्रमुख लोकांना स्वतःच्या पक्षाच्या भवितव्याची काय स्थिती होईल याची यत्किंचितही तमा न बाळगता पाठिंबा द्यायचे. म्हणजे आणीबाणीच्या काळातदेखील इंदिरा गांधींच्या विरोधात देश होता त्या वेळेला शिस्त आणण्याचा निर्णय करणारे नेतृत्व म्हणूनच ते इंदिरा गांधी यांच्यासोबत उभे होते. आम्हालाही धक्का बसावा अशी भूमिका त्यांनी घेतली होती,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 9:40 am

Web Title: ncp leader sharad pawar speaks about shiv sena balasaheb thackeray congress bjp relations saamna interview jud 87



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)