Now Lockdown in Navi Mumbai till July 19 msr 87|पुणे आणि ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईतही वाढवली टाळेबंदी

0
22
Spread the love

राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे.  मुंबई, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद या प्रमुख  शहारांमध्ये करोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. आज नवी मुंबईत २५३ नवे करोनाबाधित आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर आता नवी मुंबईतील लॉकडाउनचा कालावधी एक आठवड्याने वाढवण्यात आला आहे. त्यानुसार आता नवी मुंबईत १९ जुलैपर्यंत टाळेबंदी असणार आहे.

या अगोदर ३ जुलै ते १३ जुलैपर्यंत दहा दिवसांचा लॉकडाउन घोषित करण्यात आलेला होता. मात्र करोनाच्या वाढत्या संसर्गास आळा घालण्यासाठी लॉकडाउनचा कालवधी वाढवणे आवश्यक असल्याचे दिसून आल्याने, नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला.

नव्या निर्णयानुसार आता नवी मुंबईत १३ जुलै रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून ते १९ जुलै मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लॉकडाउन असणार आहे. या कालावधीत पूर्वीप्रमाणेच नियम व अटी असणार आहेत. शिवाय, लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे. तरी नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 7:32 pm

Web Title: now lockdown in navi mumbai till july 19 msr 87


Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)