old shanaya aka rasika sunil to return in majhya navaryachi bayko serial | ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत जुनी शनाया परतणार

0
26
Spread the love

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिजीत खांडकेकर, अनिता दाते आणि रसिका धबडगावकर यांचा त्रिकोण प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत होता. मात्र राधिका आणि गुरुनाथ सुभेदार यांच्या संसारात मिठाचा खडा बनलेली शनाया अर्थात रसिकाने काही महिन्यांपूर्वी या मालिकेतून बाहेर पडली होती. तिच्या जागी इशा केसकरने शनायाची भूमिका साकारली होती. आता या मालिकेत पुन्हा एकदा रसिका सुनील शनायाच्या भूमिकेत परतणार असल्याचं कळतंय. ‘टीव्ही ९ मराठी’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन शिकण्यासाठी रसिका परदेशी गेली होती. त्यामुळे तिने ही मालिका सोडली होती. मालिकेत रसिकाची नकारात्मक भूमिका असली तरी प्रेक्षकांचा त्याचा उत्तम प्रतिसाद मिळत होता. सध्या शनायाची भूमिका साकारणारी इशा काही वैयक्तिक कारणामुळे मालिका सोडत असल्याचं कळतंय. त्यामुळे तिच्या जागी पुन्हा एकदा जुनी शनाया परतणार आहे.

लॉकडाउनमुळे जवळपास तीन महिने मालिकांचं शूटिंग बंद होतं. मात्र आता काही अटीशर्तींचे पालन करत या शूटिंगला सुरुवात झाली आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेचंही शूटिंग सुरू आहे. पण आता रसिका सुनील यात कधीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आणि मालिकेत त्यामुळे कोणता ट्विस्ट येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

या मालिकेत अभिजीत खांडकेकर, अनिता दाते यांच्या मुख्य भूमिका आहेत. नवरा बायकोच्या गोड संसारात जेव्हा नवऱ्यावर हक्क सांगणारी एखादी तिसरी व्यक्ती येते तेव्हा हक्काची बायको तिला नवऱ्यापासून दूर ढकलत तिचा तिरस्कार करते ? की संसारातील एक आव्हान म्हणून तिचा स्वीकार करते ? याची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 9:46 am

Web Title: old shanaya aka rasika sunil to return in majhya navaryachi bayko serial ssv 92Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)