once fauji director colonel raj kapoor ran after shah rukh khan with a stone avb 95

0
23
Spread the love

अभिनेता शाहरुख खान आज बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जातो. त्याने आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. शाहरुखने छोट्या पडद्यावरील मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. १९८८ साली त्याने ‘फौजी’ या मालिकेत काम केले होते. कर्नल राज कपूर यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले होते. त्यावेळचा एक किस्सा आता समोर आला आहे. कर्नल राज कपूर हे शाहरुखच्या मागे दगड घेऊन धावले होते.

कर्नल यांनी एका मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला होता. शाहरुख मालिकेच्या शूटींगसाठी नेहमी उशिरा पोहोचायचा. त्यामुळे एक दिवस कर्नल राज कपूर यांनी शाहरुखला धडा शिकवला असल्याचे म्हटले जाते. ‘शाहरुख सेटवर नेहमी उशिरा येत असे. त्याला धडा शिकवण्यासाठी एक दिवस मी त्याच्या मागे दगड घेऊन धावलो होतो. त्यानंतर शाहरुख पुन्हा कधी उशिरा सेटवर आला नाही’ असे त्यांनी म्हटले होते.

तसेच कर्नल यांनी मालिकेत त्याची निवड करण्याबाबत वक्तव्य केले होते. ‘मालिकेतील भूमिकेसाठी शाहरुख माझ्या ऑफिसमध्ये ऑडिशन देण्यासाठी आला होता. तसेच त्याने ही भूमिका योग्य पद्धतीने साकरेन असे म्हटले होते. मालिकेतील भूमिकेसाठी त्यांनी कलाकारांना धावायला लावले होते. त्यानंतर अनेक कलाकार आलेच नाहीत. पण शाहरुखने मात्र फिटनेसशी संबंधीत सर्व गोष्टी केल्या होत्या’ असे त्यांनी म्हटले होते. ‘फौजी’ मालिकेत शाहरुख मुख्य भूमिकेत नव्हता. पण त्याने अभिनयाच्या जोरावर अनेकांची मने जिंकली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 12:59 pm

Web Title: once fauji director colonel raj kapoor ran after shah rukh khan with a stone avb 95Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)