Pansare murder case: pansare murder case पानसरे हत्या प्रकरणः अंदुरे, कुरणे यांचा जामीनासाठी अर्ज – pansare murder case: two accused file bail pleas

0
25
Spread the love

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणी एसआयटीच्या अटकेत असलेले संशयित सचिन अंदुरे आणि भरत कुरणे या दोघांनी जामीनासाठी बुधवारी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला. दरम्यान, सीबीआयच्या अटकेतील विक्रम भावे आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या जामीनासाठी पुण्यातील सीबीआयच्या कोर्टात अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती संशयितांचे वकील समीर पटवर्धन यांनी दिली.


कॉम्रेड पानसरे खूनप्रकरणी वर्षभरापूर्वी एसआयटीने सचिन अंदुरे आणि भरत कुरणे या दोन संशयितांना अटक केली होती. सध्या अंदुरे हा औरंगाबादच्या जेलमध्ये आहे, तर कुरणे हा बंगळुरच्या जेलमध्ये आहे. या दोघांना जामीन मिळावा, असा अर्ज वकील समीर पटवर्धन यांनी सुनावणीदरम्यान कोर्टात सादर केला. या अर्जावर पुढील सुनावणीत सरकारी वकील म्हणणे मांडणार आहेत. पुढील सुनावणी १७ जुलैला होणार आहे. करोना संसर्गामुळे दोन्ही संशयित सुनावणीसाठी उपस्थित नव्हते. दरम्यान, अंनिसचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनप्रकरणी सीबीआयच्या अटकेत असलेले संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि विक्रम भावे यांच्याही जामीनासाठी अर्ज सादर केल्याची माहिती अॅड. पटवर्धन यांनी दिली.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)